32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयआसामची इज्जत जात आहे, इथून लवकर चालते व्हा; एकनाथ शिंदेंना स्थानिकांचे पत्र

आसामची इज्जत जात आहे, इथून लवकर चालते व्हा; एकनाथ शिंदेंना स्थानिकांचे पत्र

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेंनी सुरतमध्ये जाऊन बंडाची ठिणगी टाकली. त्यानंतर सोबतच्या बंडोबांना घेवून त्यांनी आसामची राजधानी गुवाहाटी गाठली. गुजरात सरकार आणि पोलिसांनी एकनाथ शिंदेना मदत केली. कारण गुजरात हे भाजपचे सत्ताकेंद्र आहे. शिवाय गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र गुवाहाटीमध्ये काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदेंना लवकरात लवकर आसाम सोडायचा इशारा दिला आहे.

संविधानिक मूल्य आणि निष्ठा नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी सुरक्षित असल्याची माहिती देशभरात जाते. त्यामुळे आसामची बदनामी होत आहे. त्यामुळे आमच्या भल्यासाठी बंडखोर आमदारांनी लवकरात लवकर आसाम सोडावे, असा इशारा बोराह यांनी पत्राद्वारे दिला आहे. आसाम सध्या नैसर्गिक संकटात आहे. राज्यात पूर परिस्थिती आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. 150 हून अधिक नागरिक दोन महिन्यांत पूरामध्ये मरण पावले आहेत. 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांवर नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला आहे.

या प्रतिकूल परिस्थितीला आमच्या राज्यात येवून राहणे, हे निंदनीय आहे. आसाम सरकारला खूप कामं आहेत. तुमचे शाही आदरातिथ्य करणे जमणार नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या राज्यातून लवकरात लवकर जा. अशाप्रकारे आसाममध्ये जावून आपली नाचक्की करण्याचे काम एकनाथ शिंदे गटाने केले आहे. या बंडखोरीची चर्चा संपूर्ण भारतात सुरु असून, पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा :

शिंदे नाही तर मग ‘त्या‘ हाॅटेल मधून कोण बाहेर पडलं ?

उद्धव ठाकरेंनी, एकनाथ शिंदेंना दाखवला आरसा

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी