महाराष्ट्रराजकीय

‘एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला’

कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

टीम लय भारी 

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चीटने स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकरणात महाराष्ट्राची देशात प्रचंड बदनामी झाली आहे. कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (Atul Londhe criticizes BJP over Mahavikas aaghadi sarkar)

'एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला'

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, या ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या षडयंत्राचाच हा एक भाग होता. कॉर्डिलिया छापेमारीमध्ये भाजपाशी संबंधित लोकांचा थेट एनसीबी कार्यालयात उघड वावर होता. ही कारवाई करण्यासाठी गुजरातपासून कसा सापळा रचला होता याचा मंत्री नबाव मलिक यांनी पर्दाफाश केला होता. नवीन मलिक यांचे आरोप हे खरे होते हे आज स्पष्ट झाले आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला कोठडीत डांबून ठेवले होते. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नावही नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एनआयए, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून बनावट कारवाया करण्यात आल्या. मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा अशा षडयंत्राचेच बळी ठरले आहेत. अभिनेता सुशांतसिंह, प्रकरणातही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले पण सत्य अखेर सत्य असते ते लपत नसते हे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने मात्र महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोहींची चौकशी करून त्यांना जेलची हवा दाखवावी, असेही लोंढे म्हणाले.

 


हे सुद्धा वाचा : 

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

मुंबई पोलिसांची बदनामी महाराष्ट्र सहन करणार नाही, कॉंग्रेसचा इशारा

स्मृती इराणी इंधन दरवाढीमुळं समान्य जनता त्रस्त थेटे विमानात कॉंग्रेसच्या नेत्या भिडल्या

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close