34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeऑटोमोबाईलमहिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा...

महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

महिंद्रा बीई रॅल-ई एसयूव्ही कारचा कॉन्सेप्ट डिझाईन (संकल्पना) भारतात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. अर्थात प्रत्यक्षात या डिझाईननुसार गाडी लॉंच व्हायला वेळ आहे. ही गाडी भारतातील रस्त्यांवर प्रत्यक्षात कधी धावताना दिसेल, ते आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. BE.05 मध्ये एका नवीन INGLO आर्किटेक्चरचा वापर केला गेला आहे, ज्यात फोक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्म घटक समाविष्ट आहेत.

महिंद्रा बीई रॅल-ई अर्थात महिंद्रा रॅली या शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही कारचा हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. Mahindra BE Rall-E (Mahindra Rally) ही संकल्पना भारतात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. अर्थात प्रत्यक्षात या डिझाईननुसार गाडी लॉंच व्हायला वेळ आहे. ही गाडी भारतातील रस्त्यांवर प्रत्यक्षात धावताना कधी दिसेल, ते आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहोत.

महिंद्राने भारतात नवीन BE Rall-E या इलेक्ट्रिक वाहनाचे (EV) कॉन्सेप्ट डिझाईन (संकल्पना) प्रदर्शित केले आहे. ही ऑफ रोड SUV BE.05 संकल्पना EV वर आधारित आहे. याआधीच ब्रिटनमध्ये BE.07, BE.09, XUV.e8 आणि XUV.e9 सोबत 15 ऑगस्ट 2022 रोजी हे डिझाईन सादर केले गेले आहे. आता BE.05 आणि XUV.e9 चे डिझाईन भारतात सादर केले गेले.

Mahindra BE Rall-E concept showcased in India महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-कार; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
महिंद्रा रॅली कॉन्सेप्ट डिझाईन (फोटो क्रेडिट : गुगल)

BE.05 संकल्पनेच्या विपरीत, महिंद्रा BE Rall-E संकल्पना ही हार्ड-कोअर ऑफ-रोड SUV आहे. यात ऑफ रोड स्टाइलिंग घटक मजबूत आहेत. त्यात नव्याने डिझाइन केलेले पुढील आणि मागील बंपर, चंकी बॉडी क्लॅडिंग, 18-इंच चाके आणि एकात्मिक (इंटीग्रेटेड) LED दिवे असलेल्या रूफवर एक लगेज रॅक आहे. रॅली-स्पेक SUV च्या पुढच्या आणि मागील बाजूस नव्याने डिझाइन केलेले ऑफ-रोड ओरिएंटेड बंपर, गोल हेडलाइट्स, दिवसाचे रनिंग लाइट्स, एक लाइट बार आणि पुढील व मागील बाजूस बॅश प्लेट यांचा समावेश आहे.

Mahindra BE.05 आणि XUV.e9 संकल्पना महिंद्राने देशात प्रथमच सादर केल्या. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी 4,370mm, रुंदी 1,900mm आणि उंची 1,653mm आहे. याचा व्हीलबेस 2,775mm आहे. BE.05 मध्ये एका नवीन INGLO आर्किटेक्चरचा वापर केला गेला आहे, ज्यात फोक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्म घटक समाविष्ट आहेत. शिवाय, यात समोरील बाजूस एक एरो ब्रिज आहे, ज्यामध्ये वायुगतिकीय (एरोडायनामिक) कार्यक्षमतेसाठी विविध एअर इनलेट आणि आउटलेट्स आहेत. BE.05 च्या इतर ठळक वैशिष्ट्यांमध्ये लेव्हल 2+ ऑटोनॉमी सेन्सर्स आणि रूफवर माऊंट केलेल्या स्पॉयलरसह ट्राँग्युलर रूफलाइन यांचा समावेश आहे. दरम्यान, ऑक्टोबर 2025 मध्ये महिंद्रा BE.05 भारतात लॉंच केली जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : 

What An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर

भारतीय कंपनी लाँच करणार 16 इलेक्ट्रिक कार, 3000 कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा

मी कधीही श्रीमंत व्यक्ती होऊ शकत नाही; आनंद महिंद्रांचे कौतुकास्पद विधान

XUV.e9 संकल्पना, इलेक्ट्रिक SUV पैकी एक, BE Rall-E आणि BE.05 संकल्पनांसोबत प्रदर्शनात सादर केली गेली. तेही INGLO प्लॅटफॉर्मवरआधारित आहे. त्याची लांबी 4,790mm, रुंदी 1,690mm, व्हीलबेससह 1,905mm आणि उंची 2,775mm आहे. पुढे पूर्ण-लांबीची लाइट स्ट्रिप, उभ्या हेडलाइट्स, त्याच्या मागील बाजूस एक LED लाइट बार आणि बॉडी क्लॅडिंग मिळते. XUV.e9 संकल्पनेत XUV.e8 मध्ये नसलेले स्लोपिंग रूफलाइन दिसते. ते ऑल-व्हील ड्राइव्ह, लेव्हल 2+ सेन्सर आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल.

Mahindra BE Rall-E, Mahindra Rally, महिंद्रा रॅली, Rall-E Concept Electric Vehicle, Off Road 4 by 4 EV E-SUV

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी