29 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeऑटोमोबाईलटाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार

टाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार

टीम लय भारी

मुंबई: देशात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने १ जानेवारी २०२२ पासून भारतात कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मॉडेलनुसार प्रत्येक कमर्शिअल वाहनांची किंमतीत २.५ टक्क्यांनी वाढ होईल) Tata Motors: Prices of commercial vehicles will go up from January 1)

 नव्या किंमती मॉडेल आणि व्हेरियंटवर आधारित असणार आहेत. टाटा कर्मशिअल वाहनांसोबत इंटरमीडिएट आणि हलकी कमर्शिअल वाहनं आणि बसची निर्मिती करते.

ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….

जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न; रजिस्टर लग्न करत सर्वांसमोर ठेवला आदर्श

“स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातूंसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळेही ही किंमत वाढली आहे. वाहनांच्या निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेली सामग्री खर्च पाहता किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या एकूण इनपुट कॉस्टमुळे व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणे अत्यावश्यक आहे.”, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी फेटाळली

Tata Motors gains 2% on decision to hike CV prices

 जानेवारी २०२२ पासून वाहनांच्या किमती वाढवणारी टाटा मोटर्स ही पहिली ऑटो कंपनी नाही. आत्तापर्यंत मारुती सुझुकी इंडिया, मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑडी इंडिया यांनीही किंमती वाढणार असल्याचं जाहीर केले आहे. कच्च्या मालात सातत्याने वाढ होत असल्याने जानेवारी २०२२ पासून त्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या केवळ कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली असली तरी,कारच्या किंमतीही वाढवण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी