मुंबई

राजसाहेबांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे : अविनाश जाधव आक्रमक

एकीकडे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल असं कृत्य न करण्याची ताकीद या नेत्यांना देण्यात आली आहे.

टिम लय भारी

ठाणे : एकीकडे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल असं कृत्य न करण्याची ताकीद या नेत्यांना (Avinash Jadhav) देण्यात आली आहे. (Avinash Jadhav Said Attempts Are Being Made To Trap Rajsaheb)

राजसाहेबांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे : अविनाश जाधव आक्रमक

मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ठाणे पोलिसांनी १४९ कलमांतर्ग नोटीस बजावली आहे. तसेच आज उद्या सकाळी ११ वाजता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट २०१६ मध्ये दाखल एका गुन्ह्याप्रकरणी त्यांना बोलाविण्यात आले होते.

मनसेने आंदोलन जाहीर केल्यावर जर पोलीस असे नोटीस बजावचत असतील तर आमचे त्यांना सांगणे आहे की, मशिदीवर भोंगे लागत असताना जर पोलिसांनी अशा नोंदी घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. कोण भोंगे घेऊन जात आहे, याची नोंद ठेवण्याची सक्ती जर महाराष्ट्र शासन करायला भाग पाडत असेल तर यापेक्षा दुर्दैव काही नाही. आमचे भोंगे मोजताय तसे मशिदींवरील भोंगे मोजून घ्या. याचे परिणाम आजच्या नंतर सरकारला (Avinash Jadhav) भोगावे लागतील.

त्याच बरोबर अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचावर देखील टिका केली, उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांना वचन दिले होते महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि त्यांनी हे वचन पूर्ण देखील केले. याच प्रमाणे बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला मशिदीवरीवल भोंगे उतरले जातील असा शब्द दिला होता. परंतू आता जर महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे तर भोंग्यावरील प्रश्न हेतूपूर्वक डावला जात आहे, असे अविनाश जाधव (Avinash Jadhav) म्हटले.

हे सुध्दा वाचा :- 

Thane MNS seek permission to play Hanuman Chalisa in Mumbra

सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close