29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईबाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड येणार एकाच व्यासपीठावर 

बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड येणार एकाच व्यासपीठावर 

टीम लय भारी 

मुंबई: नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्रतर्फे (नरेडको) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर चर्चासत्राला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत. Balasaheb Thorat, Aditya Thackeray, Jitendra Awhad 

कोरोनाच्या काळात देशासह राज्यात बांधकाम, स्थावर मालमत्ता क्षेत्रापुढे अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहे. देशाच्या विकासासाठी या क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे. या क्षेत्रात नवीन कोणती आव्हाने आहेत.

ही आव्हाने पेलण्यासाठी सरकारी स्तरावर कोणती धोरणे राबविणे गरजेचे आहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्रतर्फे (नरेडको) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगासह देशातही मंदीचे वातावरण आहे. करोनाकाळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. आता ते सावरेल असे वाटत असताना रशिया आणि युक्रेनच्या युद्ध आणि त्याच्या प्रतिकूल परिणामांचा फटका या क्षेत्राला बसत आहे.

बांधकाम साहित्य, कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ही आव्हाने पाहता, सरकारने या क्षेत्राला चालना देण्यासाठी अनुकूल धोरण आखण्याची गरज असल्याचे मत नरेडको, महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रुणवाल यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा : 

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन

This Article is From Sep 12, 2021 Leaders Who Believe In Democratic Values Should Unite Under Congress Umbrella: Maharashtra Minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी