महाराष्ट्र

बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यापासून महागाई वाढवून गरिबांना लुटायला सुरु केले अशी टीका थोरांतांनी केली आहे.

टीम लय भारी

बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई: मागील सात वर्षांपासून केंद्रातील भाजपाचे सरकार महागाई वाढवत असून आता महागाईने परमोच्च टोक गाठले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यापासून महागाई वाढवून गरिबांना लुटायला सुरु केले अशी टीका थोरांतांनी केली आहे.

राज्यासह देशात इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. महागाई वाढवणाऱ्या व गरिबांना लुटणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारविरोधात महाराष्ट्र काँग्रेस आयोजित महागाई मुक्त भारत महामोर्चात सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध केला. सर्वसामान्यांचे जगणे कठिण करणाऱ्या केंद्र सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षात असताना महागाईच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणारे भाजप नेते कुठे आता गायब झाले आहेत. पेट्रोल, डिझेल महाग झाले की सर्वच प्रकारची महागाई वाढते पण त्यावर भाजपाचा एकही नेता बोलत नाही. जनतेचे प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर भाजपचे नेते बोलतात.

शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते केंद्र सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा केली नाही, त्यांना गाडीखाली चिरडले. केंद्र सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, आता ही जनताच तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

हे सुध्दा पहा: 

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

Maharashtra: Ajit Pawar and Balasaheb Thorat slam Nashik Commissioner for his charges against revenue officers

महेश तपासे यांचा मोदी सरकारवर हल्ला बोल!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close