28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमनसेच्या सभेला ऐकण्यापूर्तीच गर्दी बाकी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे : बाळासाहेब थोरात

मनसेच्या सभेला ऐकण्यापूर्तीच गर्दी बाकी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

संगमनेर : सध्या महाराष्ट्रात भोंगा, हनुमान चालीसा हे मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजतायत. त्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगरमध्ये सभा आहे. मनसेच्या सभेला नागरिकांची ऐकण्यापूर्तीच गर्दी बाकी महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे.  मताचं सुरु असणारं विभाजन आणि समाजासमाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न हे जनतेला माहित आहे. यापेक्षा जनतेला विकासाची गरज आहे. अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. (Balasaheb Thorat criticizes MNS  Raj Thackeray )

राजकारण हे विकासाचं आणि धर्म हा व्यक्तीगत असला पाहिजे

आपल्या राज्यघटनेने काही अधिकार दिलेले आहेत काही स्वातंत्र्य, परवानगी,मतमतांतर आणि पक्ष दिलेले आहेत मात्र ते राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपल्या सर्वांना करायचं आहे. दुर्दैवाने काही राजकारणी सवंग असं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसामाणसांत भेद निर्माण करणे,धर्माधर्मात भेद निर्माण करणे त्यावर राजकारण करणं सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. राजकारण हे विकासाचं असलं पाहिजे आणि धर्म हा व्यक्तीगत असला पाहिजे, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात दिसणारं चित्र उलटं आहे.

राजकारण सोपं कसं करायचं आणि मतं सहजतेने कशाप्रकारे मिळतील अशा पद्धतीने मतदानाचं विवेचन करुन मतदान मिळवणं ही एका पद्धतीचं ही जनतेची फसवणूक आहे. मला असं वाटतं या फसवणुकीला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

नेता म्हणून मिरवणाऱ्याचीही जबाबदारी आहे की…

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावर प्रशासन जागरुक आहे. मात्र सुज्ञ नागरिक म्हणून ही जबाबदारी सर्वांचीच आहे. याशिवाय जो नेता म्हणून मिरवतो त्याचीसुद्धा जबाबदारी आहे की, कोणत्याही परिस्थितीत हे राज्य शांतपणे चालले पाहिजे, असा टोला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला.


हे सुद्धा वाचा : 

 

बाळासाहेब थोरातांच्या संस्थेचे २७ विद्यार्थाी एमपीएससी परिक्षेत उतीर्ण

बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड येणार एकाच व्यासपीठावर 

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

Congress Min Balasaheb Thorat Accuses BJP Of Stoking Political Row Over Hanuman Chalisa

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी