महाराष्ट्र

बाळासाहेब थोरातांच्या संस्थेचे २७ विद्यार्थाी एमपीएससी परिक्षेत उतीर्ण

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नॅक 'ए प्लस' हा दर्जा मिळवला आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने देशात अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील सत्तावीस विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले.

टीम लय भारी

संगमनेर : राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नॅक ‘ए प्लस’ हा दर्जा मिळवला आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने देशात अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील सत्तावीस विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. असून यामुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.(Balasaheb Thorat’s institute 27 students passed of MPSC examination)

बाळासाहेब थोरातांच्या संस्थेचे २७ विद्यार्थाी एमपीएससी परिक्षेत उतीर्ण

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. वेंकटेश म्हणाले की, सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन,आधुनिक व हायटेक उच्च शिक्षणाच्या सुविधा याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी महाविद्यालय हे देशभरात लौकिकास्पद ठरले आहे. येथे सातत्याने संशोधनाला वाव दिला जात असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर स्पर्धा परीक्षेची ही तयारी करून घेतली जात आहे.यामुळे २०१९ च्या एमपीएससी परीक्षेत या महाविद्यालयाच्या (Balasaheb Thorat) सिव्हिल विभागातील 27 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) ,आमदार डॉ. सुधीर तांबे , बाळासाहेब पा गुंजाळ, बाजीराव पा. खेमनर , विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. सोनवणे, संपतराव गोडगे, सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा व्ही. बी. धुमाळ, उपप्राचार्य प्रा अशोक मिश्रा, विभाग प्रमुख डॉ मधुकर वाकचौरे, रजिस्ट्रार प्रा विजय वाघे, डॉ गुरव यांनी अभिनंदन केले आहे.

यामध्ये जलसंधारण विभागात उपविभागीय (Balasaheb Thorat) अधिकारी म्हणून प्रतिभा सखाराम खेमनर व शिवम भापकर यांची निवड झाली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यकअभियंता पदावर स्वाती कुवर, राहुल गुंजाळ आणि बाळासाहेब गीते यांची निवड झाली आहे .

जलसंपदा विभागात उप अभियंता पदावर प्रसाद नवले ,शुभम सोनवणे ,योजना गोरे, अक्षय कारले, पूजा पैय्यावल, श्वेता झावरे ,प्रवीण गायकवाड, ज्ञानेश्वर बत्तीसे , किंजल जनबंधू, राहुल वाकचौरे, ऋषिकेश राऊत ,प्रणव वरपे ,राजेश कवडे, देवेंद्र दिघे ,रामदास घुगे, पंकज शिंदे, दुर्गा कानवडे, श्रद्धा पवार ,आकाश गुंजाळ, संदीप कोल्हे ,अजित गवांदे, कल्पेश कदम यांची निवड झाली आहे. एकाच वेळेस सत्तावीस विद्यार्थी एमपीएससीत निवडली जाण्याचीही राज्यातील कोणत्याही महाविद्यालयातील पहिलीच वेळ ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. डॉ. मधुकर वाकचौरे, डॉ. जे.बी. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

हे सुद्धा वाचा :- 

Last Updated: 23rd April, 2022 21:19 IST Congress Min Balasaheb Thorat Accuses BJP Of Stoking Political Row Over Hanuman Chalisa

गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहेत त्यांच्याबाबत काय बोलणार ? : उदयनराजे भोसले

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close