29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

बाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

टीम लय भारी

अहमदनगर : महाराष्ट्र सरकारचा ई-पीक पाहणी प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर राजस्थान सरकारने हा प्रकल्प स्वीकारला. आता राजस्थानमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. इ गिरदावरी या नावाने राजस्थानमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यात मिळालेले यश पहाता लवकरच संपूर्ण  देशात हा प्रकल्प स्वीकारण्यात येईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.( Balasaheb Thorat’s vision for e-crop water project,)

पुढे बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि महसूलमंत्री रामलाल जाट यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या महसूल विभागात आधुनिक पर्वाला सुरुवात होत आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना मदत करताना आम्हाला आनंद होतो आहे.

राहुल गांधी यांनी लडाख राज्य तत्वावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला

बाळासाहेब थोरात ‘कोरोना’तून बरे झाले, जनतेसाठी केल्या महत्वाच्या सुचना

महाराष्ट्राचा हा महत्वकांक्षी प्रकल्प देशभर स्विकारला जाईल याची मला खात्री आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी या प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद दिला,त्याचे हे यश आहे असे मी समजतो.महाविकास आघाडी सरकारचा महसूल विभाग लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी कटिबध्द आहे, तो भविष्यातही देशाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरातांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे होताच त्यांनी  आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सर्वाजनिक ठिकाणी गर्दी करू नका, आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा वापर करा असे आवाहन थोरात यांनी केले आहे.

असंवेदनशील, अहंकारी व शेतक-यांचा मारेकरी पंतप्रधान म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल – नाना पटोले

Maharashtra Minister Balasaheb Thorat tests positive for Covid-19

नागरिकांनी शिस्त पाळावी

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात तिसरी लाट आली आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपन लॉकडाऊनचा सामना करत आहोत. लॉकडाऊनमुळे आधिच मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आता जर लॉकडाऊन नको असेल तर सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. अधिवेशनामुळे कोरोनाच जास्त प्रादुर्भाव झाला असे माझे वैयक्तीक मत आहे. अनेक लोकप्रतिनिधिंना कोरोनाची लागण झाली. एकत्र आल्याचा काय परिणाम होतो, हे सर्वांनीच अनुभवले त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी