29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रभरातील बालकांसाठी ,शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्रभरातील बालकांसाठी ,शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम

टीम लय भारी 

मुंबई:  राज्यात २४ एप्रिल हा दिवस पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राज्यामध्ये ग्रामसभा आयोजनाबरोबरच बालसभा आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भात बालसभा आयोजनाविषयी खालील सूचनांचे पालन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये केले जावे अशा सूचना देण्यात आल्या आहे.

राज्य शासनाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाचा महाराष्ट्रातील बालकांसाठी उपयोग होईल. ग्रामसभेसोबत बालसभांचे आयोजन करुया बालहक्कांबाबत जागृत होईल.

११-१८ वयोगटातील बालकांची “बालसभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी स्थानिक सोयीच्या वेळेनुसार आयोजित करावी.

बाल सभेचे हजेरीपट व चर्चेला आलेले विषय याची नोंद स्वतंत्र रजिस्टर मध्ये करावी. बालसभेचा एक फोटो घेण्यात यावा.

बालकांच्या विविध समस्या, विचार, मते ऐकून घेऊन बालसभेमध्ये झालेल्या चर्चेची व निर्णयांची नोंद संबंधित रजिस्टर मध्ये करावी.

बालसभेमध्ये घेतलेल्या निर्णयांची व झालेल्या चर्चेची माहिती ग्रामसभेपुढे मांडावी व ग्रामसभेमध्ये बालकांच्या विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत

शाश्वत विकासाची ध्येय २०३० पर्यंत प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली पंचायत “बालस्नेही पंचायत” बनवणे अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेपुढे ठेवून चर्चा करावी.

बाल सभा आयोजन करताना पुढील विषयावर बालकांमध्ये चर्चा घडवून आणावी:

बालविवाह, बालमजुरी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या बालकांविषयीच्या विविध समस्या व त्यावर उपाययोजना

बालकांचे हक्क व त्यांची अंमलबजावणी,

.बालकांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व त्यासाठी पात्रता असणाऱ्या बालकांची यादी,

 पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बालकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व १०% निधी उपयोगाबाबत बालकांच्या सूचना,

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी गावपातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यासंदर्भात चर्चा घडवून आणणे.

तरी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

हे सुध्दा वाचा:

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : नाना पटोले

रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं

चित्रा वाघ यांनी ठणकावले, एसटी आंदोलकांचा संबंध देवेंद्रंशी जोडू नका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी