28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeआरोग्यकाळजी घ्या! कोरोनानंतर वाढले आता 'स्वाईन फ्लु'चे संकट

काळजी घ्या! कोरोनानंतर वाढले आता ‘स्वाईन फ्लु’चे संकट

टीम लय भारी

मुंबई : शहरात गेले दोन आठवडे पाऊस दमदारपणे बरसला, मात्र आता पावसाने काहीशी विश्रांती घेत सगळ्यांनाच थोडा दिलासा दिला. दरम्यान पावसामुळे पसरणाऱ्या रोगराईचा धोका शहरात वाढू लागला आहे. शहरात स्वाईन फ्लु (H1N1) आणि गेस्ट्रोचे संकट वाढले आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना संकट आता काहीसे ओसरले असले तरीही शहरात आता स्वाईन फ्लुचे संकट भिरभिरू लागले आहे. दरम्यान सध्या हे संकट गंभीर नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

स्वाईन फ्लुचे जून महिन्यात केवळ दोन रुग्ण आढळले होते, परंतु आता जुलै महिन्यात रुग्णांची संख्या थेट अकरावर पोहोचली आहे. या वर्षी एकून 15 जणांना लागण झाल्याची नोंद आहे.

यावर संसर्गजन्य रोगतज्ज्ञ वसंत नागवेकर म्हणतात, जर रुग्ण फ्लुच्या उपचारांवर प्रतिसाद देत नसेल तर तो स्वाईन फ्लु म्हणजेच H1N1 आहे का हे डाॅक्टरांनी तपासून पाहिले पाहिजे.

दरम्यान, शहरात गेस्ट्रोची सुद्धा साथ सुरू झाली आहे. आतापर्यंत 340 केसेसची नोंद करण्यात आली आहे. हिपॅटायटीस चे सुद्धा 38 रुग्ण या महिन्यात आढळून आले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचा सध्या धोका नसला तरी त्याच्या सुद्धा डझनभर केसेसची नोंद करण्यात आली आहे.

पाऊस सुरू झाला तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

शिंदे गटाची ताकद वाढली

लाईटचे 80 हजारांचे  बील पाहून बिघडले मानसिक संतुलन, केले ‘हे’ कृत्य

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी