मुंबईमहाराष्ट्रराजकीय

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भारतातील शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyar) यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात 'सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना' या उपक्रमाचा शुभारंभ केला. सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत.

टीम लय भारी

मुंबई :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyar) यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या ‘हरी बोल’ उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. (Bhagat Singh Koshyari farmers in India prosper through)

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भारतातील शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

काय आहेत सेंद्रिय शेतीचे फायदे

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyar) यावेळी केले.

यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते.  राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली. (Bhagat Singh Koshyari farmers in India prosper through)


हे सुद्धा वाचा :

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कर्तृत्ववान नवउद्योजकांचा गौरव

तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेला आहात का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रश्न

नवाब मलिकांनी राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला

Maharashtra set to be become 1 trillion dollar economy: Governor Koshyari

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close