31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईसाहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

साहित्य प्रचार – प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

टीम लय भारी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय लिखित ‘कथा साहित्य का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या (Bhagat Singh Koshyari) हस्ते रविवारी राजभवन मुंबई येथे करण्यात आले. (Bhagat Singh Koshyari Publication of the book)

त्यावेळी राज्यपाल बोलत होते, पुस्तक समीक्षक आरस्याचे काम करतात. पुस्तक परीक्षणामुळे वाचकांची संख्या वाढते तसेच लेखकाला देखील लिखाणातील त्रुटी दिसून येते. परीक्षणा अभावी चांगली पुस्तके देखील दुर्लक्षित राहतात. त्यामुळे साहित्य प्रचार – प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  Bhagat Singh Koshyari) यांनी येथे केले.

अकॅडेमिस्तान, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून (Bhagat Singh Koshyari) आयोजित प्रकाशन सोहळ्याला समाज सेविका सुमिता सुमन सिंह, अकॅडेमिस्तानचे संस्थापक दीपक मुकादम, वीरेंद्र  याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

मराठी, हिंदी, बंगाली यांसह भारतीय भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस साहित्य कृती निर्माण झाल्या आहेत. मराठी वृत्तपत्रे पुस्तक साहित्य परीक्षणाला विशेष महत्व देतात. अनेक महिला समीक्षक देखील मराठी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक (Bhagat Singh Koshyari) परीक्षणे लिहिताना दिसतात.

त्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे कमी असतात असे मत नोंदवताना परीक्षणामुळे वाचकांमध्ये पुस्तक वाचनाची इच्छा जागृत होते असे राज्यपालांनी सांगितले. नुकताच गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कादंबरीला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक  मिळाले हा सर्व भारतीय भाषांचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) सांगितले.

साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

भारतात शास्त्रीय तसेच साहित्यिक समीक्षा – मीमांसेची एक मोठी परंपरा है.  समीक्षक व टीकाकारांमुळेच साहित्य कृतींकडे वाचक व समाजाचे लक्ष जाते. समीक्षक लेखकाच्या साहित्यातील सारगर्भित अर्थ दर्शवतो, असे सांगताना ‘कथा साहित्य का पुनर्पाठ’ नेमके हेच कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) सांगितले.

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना लिहिलेल्या या पुस्तकात सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर सुरु झालेल्या हिंदी पुनर्जागरणापासून समकालीन लेखक व कादंबरीकार यांच्या (Bhagat Singh Koshyari) लिखाणाचे विश्लेषण करण्यात आले आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra governor releases Postal Department’s first-day cover on 75 years of Banga Maitri Sansad

या आयएएस आयपीएस लोकांचं करायचं काय ?

भगव्या स्टिकरवाल्या दुकांनांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांची खोचक प्रतिक्रिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी