36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रडॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

टीम लय भारी 

मुंबई : ‘सेवांकुर भारत’ या संस्थेच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने  सारागूर, म्हैसूर ‘एक आठवडा देशासाठी’ या शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या ९५ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची शनिवारी (दि. २८) राजभवन येथे भेट घेऊन आपले अनुभवकथन केले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.    (Bhagat Singh Koshyari’s appeal to doctors)

 

सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतु सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज आपल्याला खूप काही देत असतो. त्यामुळे आपण समाजाचे फार मोठे देणे लागतो. यास्तव, डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील किमान एक महिना किंवा एक पक्षमास देशासाठी दिल्यास त्यांना आत्मिक आनंद लाभेल व त्यांचा अनुभव देखील वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ इंदिरा हिंदुजा, डॉ यतींद्र अष्टपुत्रे, डॉ अश्विनीकुमार तुपकरी, डॅा आरती आढे, महादेव पडवळ आदी उपस्थित होते.

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

 

सेवांकुर भारत या संस्थेने औरंगाबाद येथे सुरुवात करुन आज देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच डॉक्टरांचे संघटन झाल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवडी शिबीर आयोजित करून ‘सेवांकुर’च्या माध्यमातून समाजसेवेची भावना रुजवली जाते हे स्तुत्य कार्य असून सेवांकुरच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

 

डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाचे ज्ञान घेताना उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक तसेच उत्तम नेते देखील झाले पाहिजे असे सांगून उत्तम नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी अधिक सेवा करणे आवश्यक असते असे राज्यपालांनी सांगितले.  राज्यपालांशी झालेल्या भेटीच्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या ६९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ९५ वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा : 

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिली भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि स्टार्टअप्सचा घेतला आढावा

शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागतायत

सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

केवळ आर्थिक राजधानी नाही; महाराष्ट्र ही संत, वीर योद्धे व समाज सुधारकांची भूमी : भगत सिंह कोश्यारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी