28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि स्टार्टअप्सचा घेतला आढावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि स्टार्टअप्सचा घेतला आढावा

टीम लय भारी

मुंबई : 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी राज्यातील 11 पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा एका विस्तृत बैठकीत आढावा घेतला.विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्टार्टअप्स व उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचा राज्यपालांनी यावेळी विद्यापीठनिहाय आढावा घेतला.(Bhagat Singh Koshyari reviews innovative concepts and startups of universities)

मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत शुक्रवारी २५ मार्च रोजी राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपालांनी (BhagatSingh Koshyari) आढावा घेतला. विद्यापीठांनी इन्क्युबेशन केंद्रातून काय सुविधा दिल्या, विद्यापीठांमधून किती पेटंट्स मिळाले तसेच विद्यापीठांच्या नवसंकल्पनांना किती बीज भांडवल मिळाले याची देखील राज्यपालांनी (BhagatSingh Koshyari) चौकशी केली.

विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे मत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( BhagatSingh Koshyari) यांनी प्रत्येक विद्यापीठांच्या यशोगाथा वाढावयास पाहिजे, असे मत व्यक्त केले.यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व इतर विद्यापीठांच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


हे सुद्धा वाचा –

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदी सरकारच्या सुचना बसविल्या धाब्यावर

Bhagat Singh Koshyari remarks on Shivaji trigger protests

रोहित पवारांनी विधानसभेत मांडलं पोलिसांचं दुखण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी