28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल'

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

टीम लय भारी

मुंबई : आयकर विभागाने राज्यात घातलेल्या छापेमारीतून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांच्या नियुक्त्या आणि सरकार दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी काही मध्यस्थी लोक कोणत्या मार्गाने संपत्ती जमा करतात. या संदर्भाची माहिती छापेमारीत उघड झाली आहे. तसेच मविआ सरकारने याबाबतचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे (BJP attacks once again on MVA government).

आयकर विभागाच्या छाप्यात सरकारी जमिनीचे हस्तांतरण तसेच सरकारी मान्यता मिळवून देण्यापर्यंतच्या कामात मध्यस्थांची साखळी कशी गुंतली होती याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या वेळी सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्याचे खंडणी प्रकरण जेव्हा सुरु होते. त्यावेळी भाजपाने प्रत्येक खात्यात किती वाजे आहेत अशी विचारणा केली होती.

निमंत्रण पत्रिकेवर नाही परंतु जनतेच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस

एनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

परंतु आयकर विभागाने उघड केलेल्या छाप्यात अनेक वाजे हे राज्य सरकारच्या यंत्रणेत कार्यरत असल्याचे दिसत आहेत. आतापर्यंत आयकर विभागाला १०५० कोटींच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. या संदर्भात देखील मविआ सरकारने खुलासा करण्याची आवश्यकता आहे, असे उपाध्ये म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी, शिवसेनेचा टोला

Cruise Ship ‘Raid’: Top BJP Leader’s Brother-in-Law Among 2 let off by NCB, Alleges NCP

'मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल'

यावेळी त्यांनी माविआ सरकारवर आणखी एक टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका पैशाची मदत न करता उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंदची हाक देऊन. आपला ढोंगीपणा मविआ सरकारने दाखवला आहे. मविआ सरकारचे हे मगरीचे अश्रू आहेत, असे उपाध्ये म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी