33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचा धनगरांवर वरवंटा, मराठवाड्यात अन्याय

भाजपचा धनगरांवर वरवंटा, मराठवाड्यात अन्याय

टिम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाची (BJP) विचारधारा नेहमीच देशला आणि धर्माला सर्वोच्चस्थानी मानणारी आहे. म्हणूनच की काय धनगर समाजचे भाजपावर विषेश प्रेमात असावा कारण धनगर समाजातील लोक हे सुध्दा देश व धर्माला सर्वोच्च स्थानी मानतो. आज ही ग्रामीण भागात पूर्वीची माणसं कोणताही विचार न करता डोळे झाकून काँग्रेसला मत देतात. अगदी तसंच धनगर समाजाच आहे. (BJP did injustice to Marathwada)

अगदी त्याप्रमाणे धनगर समाजही कोणताही विचार न करता एकमेव पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सर्वोच्चस्थानी भाजपला (BJP) मतदान करताना दिसून येतो. एवढी श्रद्धा आणि विश्वास धनगर समाजाचं भाजपा वरती आहे. धनगर समाजात नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, मराठवाड्यातील गणेश दादा हाके असतील यांच्या नेतृत्वावर धनगर समाजाने नेहमीच प्रेम केलं आहे.

जेव्हा बारामतीला २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनगर समाजाने धनगर आरक्षण विषयात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते . तेंव्हा शरद पवारांना हैराण करून सोडले होते त्यावेळी फडणवीस (BJP) यांनी उपोषण स्थळी येऊन घोषणा केली होती की भाजपा सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ.

देवेंद्र फडणवीसांच्या (BJP) त्या आश्वासनामुळे धनगर समाजाने भाजपाच्या ओणझळीत मत टाकली होती. आताचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाजाला बिरोबची शपथ घेऊन भाजप च्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा समाज व्यक्ती पेक्षा पक्षाला मानणारा असल्यामुळे समाजाने पडळकर यांना मोजले नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन समाज कायम भाजप पक्षाच्या पाठी मागे खंबीर उभा राहिला.

परंतु नंतर च्या काळात सत्ता आल्यावर दोन मंत्री पद सोडली तर समाजाच्या वाट्याला फार काही मिळाल नाही. जे आदिवशीना ते धनगरांना ही योजना पण फेल ठरली. पण धनगर समाज संयमी व शांत असल्यामुळे आज ही मराठवाड्यात मोठ्या (BJP)  प्रमाणात भाजप सोबत आहे.

प्रामुख्याने मराठवाड्यात गंगाखेड, कळमनुरी, जिंतूर, केज, परळी, गेवराई, अहमदपूर, कळमनुरी, हिंगोली, मुदखेड. गंगापूर, आदि विधानसभा मतदार संघात निर्णायक आहे तर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, या ठिकाणी निर्णयाक आहे. नांदेड मध्ये तर अशोक चव्हाण (BJP)  यांना धनगर समाजाच्या उमेदवार मुळे पराभूत व्हावं लागले. वरील उल्लेख केलेल्या सर्वच मतदार संघात धनगर समाज भाजप सोबत नेहमी प्रामाणिक व खंबीर सोबत उभा राहिल्याचे चित्र आपण सगळ्याच निवडणुकीत दिसून आले आहे.

परंतु मराठवाड्यात भाजप (BJP) ने कधीच धनगर समाजाचा विचार केल्याचं दिसून आले नाही. मराठवाड्यात कै.गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाने भारतीय जनता पक्षाला वाढलं. आज पर्यत एकदा ही भाजप ने धनगर समाजाला मराठवाड्यातून विधान परिषदेत किंवा राज्यसभेत समाजाचा प्रतिनिधीम्हणून सभागृहात पाठवला नाही.

आज गेली अनेक वर्षे झाली मराठवाड्यात भाजप (BJP) मध्ये धनगर समाजातील नेते मंडळी निष्ठावान राहून मोठ्या जिद्दीने भाजप चा विचार घराघरात रुजवण्यासाठी काम करताना दिसून येते. धनगर समाजाला पक्षाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र समाजात निर्माण होईल. आणि भाजप वरचा धनगर समाजाचा विश्वास अधिक वृद्धीगत होण्यास मदत होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने यांचा गांभीर्याने विचार करून मराठवाड्यातील धनगर समाजाला न्याय द्यायला हवा.

हे सुद्धा वाचा :- 

Amruta Fadnavis walks the Cannes 2022 red carpet in gorgeous black gown; see pics

‘बाळासाहेब ठाकरे यांना अश्रू अनावर झाले असतील’

पंडित जवाहरलाल नेहरू हे कर्तृत्व प्रत्येकाला माहीत असायलाच हवे, हेमंत देसाई यांचे विश्लेषण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी