33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबई‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’

‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात व्यक्तीगत वाद आहे. हे वादंग शिवसेनेतील अंतर्गत आहे. त्याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी चर्चा देवेंद्र फडणवीस व रामदास आठवले यांच्यात झाली आहे. आठवले यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

शिवसेनेतील ४४ – ४५ आमदार फुटलेले आहेत. सरकार अल्पमतात आलेले आहे. सरकार अल्पमतात असताना शिंदे गटातील आमदारांवर कारवाई करणे चुकीचे आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचाही आरोप आठवले यांनी केला.

सत्ताधाऱ्यांकडून १६ आमदारांना निलंबित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तसे करता येणार नाही. दोन तृतियांश आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ते निलंबन करू शकत नाहीत. एकवेळ तुम्ही या आमदारांना पक्षातून काढू शकता. पण त्यांची आमदारकी रद्द करू शकत नाही, असेही आठवले म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे. शिवसैनिकांची गुंडगिरी सुरू आहे. एकनाथ शिंदेंसोबतही कार्यकर्ते आहेत. ते सुद्धा तोडफोड करू शकतात. रिपब्लिकन पक्षात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पोलिसांच्या समोर फलक तोडले जात असतील तर ते योग्य नाही. आमदार परत आले की ते तुमच्याकडे येतील, असे तुम्हाला वाटत असेल. तुम्ही तसा प्रयत्न करा. पण दादागिरी करू नका, असाही सल्ला आठवले यांनी दिला. शिवसेनेने दादागिरी केली तर आमच्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहतील, असा इशाराही आठवले यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

महाराष्ट्राला भिकेला लावू इच्छिणाऱ्या ‘खेकडा’फेम तानाजी सावंतांची ‘लफडी’ बाहेर येणार !

उद्धव ठाकरेंचा आरोप; भाजपला शिवसेना संपवायची आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी