33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईसत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलेय : आशिष शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल

सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलेय : आशिष शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरवर्षी सरासरी ४० हजार कोटींचा अर्थ संकल्प सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षात २ लाख कोटी रुपये खर्च केले ते कुठे गेले? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी भाजपाच्या पोल-खोल सभेमध्ये आज सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलाय अशा शब्दात जोरदार हल्लाबोल केला.मुंबई भाजपातर्फे मुंबई पोल-खोल सभांचे आयोजन करण्यात आले असून या शृंखलेतील दुसरी सभा आज दहिसर येथील गणपत पाटील नगर मध्ये झाली. आमदार मनिषा चौधरी, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. (BJP leader Ashish Shelar’s criticize Mumbai Municipal Corporation)

या सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आमदार अँड आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करीत शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकार मध्ये एक मंत्री असा आहे की, जो म्हणतोय नवाब मलिक का सपना दाऊद का माल अपना, दुसरा मंत्री आसलम शेख ज्यांनी याकुब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. अशा मंत्र्यांना सरकारच संरक्षण देणार असेल तर अशा वेळी मुंबईकरांचे संरक्षण कोण करणार? या मुंबईतील १ कोटी ४० लाख मुंबईकरांसाठी महापालिका पाच वर्षात २ लाख कोटी खर्च झाले.

मग जागतिक किर्तीचे डाँक्टर अमरापूरकर यांचा मँनहोलमध्ये पडून मृत्यू कसा होतो? घाटकोपरची एक महिला चक्कीवर दळण टाकण्यासाठी निघते तीचा मृत्यू गटारात पडून कसा होतो? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील कुटुंबाला पालिका रुग्णालयात चार तास उपचार का मिळाले नाहीत? पालिका रुग्णालयात औषध का मिळत नाहीत? असे प्रश्न विचारत २ लाख कोटी रुपये मग जातात कुठे? मुंबईला दुर्दैवाने मृत्यूचा साफळा करण्याचे काम (BJP leader Ashish Shelar) सत्ताधाऱ्यांनी केले आहे. चोवीस तास पाणी देणार सांगितले, ६०  हजार कोटी खर्च केले मग चोवीस तास पाणी मिळाले का? असा प्रश्न ही उपस्थितीतांना त्यांनी केला.

गणपत पाटील नगर मधील गरिब माणसाला घर देण्याचा विषय आला की, हा एनडी झोन आहे असे सांगितले जाते तर अंधेरीतील मधू वखारिया यांची मोकळी जागा ज्यावर पण तिवर आहेत ती जागा आरक्षण बदलून मात्र अविनाश भोसले, विकी ओबेरॉय बिल्डरांना दिली जाते, मेट्रो कारशेडचे काम झाडे तूटणार सांगत अडविले जाते दुसरीकडे बिल्डरांना ३८ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते, असे पालिका आणि आघाडी सरकारच्या वागण्यातील विरोधाभास मांडत याबाबत सवाल विचारण्यासाठी ही पोलखोल सभा आहे. मुंबईकरांचे हे प्रश्न आम्ही विचारायचे नाहीत काय? असा सवाल (BJP leader Ashish Shelar) ही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा :- 

Mumbai: BJP leader Ashish Shelar writes to MSRDC after 5 hour power outage in Khar and Santacruz

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे : प्रवीण दरेकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी