28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ, 50 दिवसांत 'डर्टी डझन' जेलमध्ये जाणार?

किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ, 50 दिवसांत ‘डर्टी डझन’ जेलमध्ये जाणार?

टीम लय भारी

 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. या घोटाळ्यांमधील 12 जणांना ‘डर्टी डझन’ अशी उपाधी कीरीट सोमय्या यांनी दिली आहे. अनिल परब यांचा घोटाळा समोर आणण्यासाठी ते दापोलीच्या बंगल्यावर गेले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आता किरीट सोमय्यांच्या रडारवर कोण? अशी चर्चा सुरु आहे. त्यातच या किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. (Bjp Leader Kirit Somaiya Hasan Mushrif Who)

किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ, 50 दिवसांत 'डर्टी डझन' जेलमध्ये जाणार?

हसन मुश्रीफ (Hassan Mshrif) ग्रुपच्या १५८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या शुक्रवारी आयकर, कंपनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात भेट घेणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया 50 दिवसांत सरळ होणार

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यालाच किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सरकार 50 वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया 50 दिवसांत सरळ होणार. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील 50 दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही’, असे किरीट सोमय्या म्हणाले.


हे सुद्धा वाचा :

Kirit Somaiya visits Dapoli, vows to demolish resort ‘linked’ to Sena’s Anil Parab

किरीट सोमय्यांचा लिस्टमध्ये आणखी दोन बड्या नेत्यांचा समावेश

लफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

जरंडेश्वर साखर कारखाना मूळ सदस्यांना सोपवावा – किरीट सोमय्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी