29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'विक्रांत फाईल्स' प्रकरणी सोमय्या पिता-पुत्राचा, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

‘विक्रांत फाईल्स’ प्रकरणी सोमय्या पिता-पुत्राचा, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

टीम लय भारी 

महाराष्ट्र : किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ११ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. सोमय्या आणि त्यांच्या मुलावर २०१३- १४ मध्ये आय.एन.एस विक्रांतच्या बचावाच्या मोहिमे दरम्यान जमा झालेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.(BJP leader Kirit Somaiya)

आय.एन.एस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. परंतू किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन सोमय्या वकिलांनी न्यायालयने फेटाळला आहे.

वकिलांनी सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी उपस्थित न राहण्याचे मागचे सांगितले कारण :

सोमय्या यांच्या वकिलांनी काल याबाबत माहिती देताना सांगितले होते की, ‘आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र (BJP leader Kirit Somaiya) चौकशीसाठी हजर राहतील.’

हे सुद्धा वाचा : 

Mumbai: Court rejects anticipatory bail plea of BJP leader Kirit Somaiya

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी