29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयभाजप नेत्या पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

टीम लय भारी
बीडः बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळया प्रसंगी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साधला. आपल्या जिल्ह्यातली लक्ष्मी हरवलीय, त्यामुळे हे वाईट दिवस आले आहेत.( BJP leader Pankaja Munde’s venomous remarks on Dhananjay Munde)

मी पालकमंत्री असते तर जिल्ह्याचा विकास केला असता. त्यात कोणताही भेदभाव केला नसता, अशा कठोर शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडेंनी आपल्याच पक्षाचे कान टोचले

Pankaja Munde : पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास अनुत्सुक, समर्थकही नाराज

पंकजाताईंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण फडणविसांना नाही दिल्या

COVID-19 in Mumbai: BJP leader Pankaja Munde tests positive for Omicron

पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले. माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते. मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते. मी विकास करताना कोणते गाव कुठल्या पक्षाचे आहे, हे पाहिले नाही. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी भेदभाव केला. बीड जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समसितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी