28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयआम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही :  गोपीचंद पडळकर

आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही :  गोपीचंद पडळकर

टीम लय भारी 

जामखेड: अठरा पगड बहुजन समाजाचे दैवत आणि हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे. ३१ मे रोजी चौंडी येथे आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत. समस्त बहुजन समाजाला आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) वाफगाव ते चौंडी कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहे असं त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विटरला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्रही शेअर केलं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या पवारांवर निशाणा साधला आहे.

चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही असा ही आरोप त्यांनी केला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले की,  आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाहीये. कृपया असे कृत्य करू नये. अन्यथा संघर्ष अटळ आहे असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: 

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन

Eviction Proceeding Initiated Against Bhagwant Mann For ‘Unauthorised’ Occupation Of MP’S Flat In Delhi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी