33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजपचा विजयी चौकार, मुंबई अकोल्याची जागा खेचून आणली, शिवसेना काँग्रेसला फटका

भाजपचा विजयी चौकार, मुंबई अकोल्याची जागा खेचून आणली, शिवसेना काँग्रेसला फटका

टीम लय भारी

मुंबई: भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या (Maharashtra MLC Election) 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मुंबईतील (Mumbai) 2, कोल्हापूर(Kolhapur), धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar), अकोला-बुलडाणा- वाशिम (Akola Buldana Washim), नागपूर (Nagpur), या 6 जागांसाठी निवडणूक पार पडली(BJP’s four in Vidhar Parishad elections)

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेना, 2 काँग्रेस 2 आणि भाजप 2 असं पक्षीय बलाबल होतं. मात्र, भाजपनं मुंबई आणि अकोल्याची जागा खेचून आणत विधानपरिषदेतील संख्याबळ वाढवलं आहे.

बुलढाणा, अकोला,वाशिममध्ये भाजपचा विजय

Infinix InBook X1 आणि InBook X1 Pro लॅपटॉप भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

भाजपकडून विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), वसंत खंडेलवाल (Vasant Khadelwal), अमरिश पटेल (Amarish Patel) आणि राजहंस सिंह (Rajhans Singh), शिवसेनेकडून सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि काँग्रेसचे सतेज पाटील (Satej Patil) या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

मुंबईत शिवसेनेचे सुनील शिंदे तर भाजपचे राजहंस सिंह विजयी

शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवरं संधी देण्यात आली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांचं विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात आलं. शिवसेनेनं रामदास कदम यांना पुन्हा संधी दिली नाही.

याशिवाय विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई यांची नावे चर्चेत होती. मात्र, या जागेसाठी सुनील शिंदे यांचं नाव शिवसेनेतून फिक्स करण्यात आलं. तर, मुंबईतल्या दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा कार्यकाळ संपला होता.

अकोला विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर प्रविण दरेकर म्हणाले…

Maharashtra MLC polls: BJP wins 4 of 6 seats; wrests Akola-Buldhana-Washim seat from Shiv Sena 

मात्र, मतांचं गणित पाहता काँग्रेसनं मुंबईत उमेदवार दिला नाही. त्यामुळं भाजपे राजहंस सिंह बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसमधून 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या राजहंस सिंह यांना भाजपकडून संधी देण्यात आली. मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील बिनविरोध

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिक यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापूरमधील दोन्ही पारंपारिक विरोधक या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आल्यानं निवडणूक रंगतदार होईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्तृत्वामध्ये चर्चा झाल्यानंतर अमल महाडिक यांनी उमेदवारी मागं घेतल्यानं सतेज पाटील बिनविरोध विजयी झाले.

अमरिश पटेल यांची विधान परिषदेत तिसरी टर्म

धुळे-नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार गौरव वाणी (Gaurav Wani) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अमरिश पटेल (Amrish Patel) यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020 च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजयी मिळवून, आपली ताकद दाखवून दिली होती. अमरिश पटेल यांची विधानपरिषदेतील तिसरी टर्म सुरु झाली आहे.

अकोला बुलडाणा वाशिममध्ये तीन वेळचे आमदार गोपिकिशन बाजोरिया पराभूत

सलग तीन वेळा अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघाचे विधान परिषदेच प्रतिनिधीत्व करणारे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना अखेर मात देवून भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी झाले असून यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. अकोला बुलडाणा वाशिम विधान परिषद मतदार संघात गोपिकिशन बाजोरिया यांना 334, वंसत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली. तर 31 मतं बाद झाली आहेत.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.

नागपूरचा गड भाजपनं राखला

नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपनं यावेळी गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. काँग्रेसनं सुरुवातीला भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना फोडत आक्रमक चाल खेळली. मात्र, त्यानंतर काँग्रेस तितकी आक्रमक राहिली नाही.

मतदार फुटू नये म्हणून भाजपनं मतदारांना सहलीवर पाठवलं. मतदारांना सहलीवर पाठवत मतदार एकत्रित ठेवत मतदार फुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेण्यात आली. यानिमित्तानं भाजपनं नागपूरची जागा राखली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी