29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईभाजपचे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा केली होती शिवसेनेशी 'गद्दारी'

भाजपचे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा केली होती शिवसेनेशी ‘गद्दारी’

टीम लय भारी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदासाठी उद्या दि. ३ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर हे भाजपकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदार संघातून विजयी होऊन आलेले आहेत. पण राहुल नार्वेकर हे देखील मुळातील शिवसेना पक्षाचे होते. परंतु त्यानंतर शिवसेना पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.

२०१४ मध्ये शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१४ मध्येच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली. ते ३ वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत.

राहुल नार्वेकर पुढे या पक्षात थांबले नाही तर, ‘ज्याचे ‘पारडे’ जड तिथे राहुल नार्वेकर’ असे म्हणत त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. एकंदरीतच शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी केली. ज्या पक्षाने राहुल नार्वेकर यांच्या राजकीय कारकिर्दीला महत्व प्राप्त करून दिले, त्यांच्याच पाठीत राहुल नार्वेकर यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्याने खंजीर खुपसण्यात आला होता.

राहुल नार्वेकर यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील देखील मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. तर २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे वॉर्ड क्र. २२७ तर त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या वॉर्ड क्र. २२६ च्या नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या.

दरम्यान, आता विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी माजी शिवसैनिक राहुल नार्वेकर आणि एकनिष्ठ शिवसैनिक राजन साळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. तर बंडखोर पण, तथाकथित शिवसेना आमदार आता शिवसेनेला मतदान करणार की, भाजपला आपले मत देणार हे पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाचक

Exclusive : एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका, तीन मंत्रीपदे कमी झाली

नवीन मुख्यमंत्र्यांना माजी आमदाराचे पत्र, फडणवीस यांच्यापासून सावध राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी