32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeजागतिकभारताला ‘ब्लॅकस्वान‘चा लागू शकतो झटका

भारताला ‘ब्लॅकस्वान‘चा लागू शकतो झटका

टीम लय भारी

मुंबईः भारतीय रिझर्व बॅंकेने आर्थिक महामंदी येण्याची शक्यता असल्याचे भाकीत वर्तवले आहे. जगभरात तसेच भारतात कधीही आर्थिक मंदी येऊ शकते. या आर्थिक मंदीचा फटका सर्वसामन्य लोकांना जास्त प्रमाणात बसू शकतो. ही आर्थिक मंदी कधी येईल ते नेमके कोणीही सांगू शकत नाही. अशा प्रकारे अचानक पणे मंदीला ‘ब्लॅकस्वान‘ इव्हेंट असे म्हणतात.

या प्रकारे आर्थिक महामंदी आली तर, रोकडा पैसा कमी होईल, रोजगार कमी होतील, नोकरया जाऊ शकतील. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ही मंदी चालू शकते. जगातले सगळे मार्केट डाऊन होतील, शेअर मार्केटमध्ये मोठयाप्रमाणात घरण होऊ शकते. 2001, 2008, 2011 मध्ये आशा महामंदी येऊन गेल्या आहेत. युके्रन युध्द हे एक कारण महामंदीसाठी लागू होते. मात्र त्यामुळे ‘ब्लॅक स्वान‘ इव्हेंट झाले असे म्हणू शकत नाही.

भारतात ‘ब्लॅक स्वान‘ इव्हेंटची निर्माण होण्याचे कारणे कोरानाचा काळ सुरु होता. त्यावेळी अमेरिकेतील लोकांना नोकरी नव्हती. उदयोग धंदे बंद होते. त्यामुळे अमेरिकन सरकारने नागरिकांना मोठया प्रमाणात मदत केली. त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले. ज्यांच्याकडे अधिपासून पैसा होता, तसेच पुढे नफा मिळावा या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. अनेकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांमध्ये विविध मार्गाने पैशांची गुंतवणूक केली.

काही काळानंतर अमेरिका तसेच इतर देशांमध्ये महागाईने कळस गाठला. त्यावेळी हा गॅप भरुन काढण्यासाठी अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व बॅंकेने व्याज दर वाढवले. त्याचा परिणाम लोकल बॅंकावर झाला.
आता शेअर मार्केमध्ये गुंतवलेला पैसा परत घेण्यास सुरुवात झाली. की भारताचा जीडीपी आपोआप घसरायला सुरुवात होईल असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे पैसा कमी आणि महागाई जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल. ती साधी महामंदी नसेल तर ‘ब्लॅक स्वान इव्हेंट‘ असण्याची शक्यता आहे.

जगभरातील सर्व सेंटल बॅंका व्याज दर वाढव आहेत. त्यामुळे जीडीपीवर परिणाम होऊ शकतो. ‘इसीम निकोलस तलेस‘ यांनी 2007 मध्ये ‘द ब्लॅक स्वान ‘ हे पुस्तक लिहीले. त्यामध्ये त्यांनी या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ‘ब्लॅक स्वान‘ म्हणजे ‘काळा हंस‘ काळा हंस कधी कोणी पाहिला नाही. परंतु एका पर्यटकांने तो पाहिला असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे या महामंदीला ‘ब्लॅक स्वान‘ इव्हेंट नाव देण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा:

 

भारताला ‘ब्लॅकस्वान‘चा लागू शकतो झटका

मुंबईच्या ‘या’ माजी पोलिस आयुक्तांच्या मागे लागली ईडीची पीडा

आरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी