30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

टीम लय भारी

जळगाव : अनेकदा रक्तदान शिबिरातून रक्त संकलन (Blood donation) केले जाते. त्यासाठी लोक वाढदिवस, स्मृतिदिन तसेच विशेष दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. परंतू ज्याठिकाणी खरच रक्तदानाची आवश्यकता असते त्या ठिकाणी रक्तदान करणे म्हणजे श्रेष्ठदान करणे कसा मानले जाते. असेच कौतुकास्पद कार्य शिवसैनिकांनी केले आहे. (Blood donation by Shiv Sena Medical Aid Cell )

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ११ रक्त पिशव्या (Blood donation) संकलीत करण्यात आल्या.

Anil Anna Gote advt

गेल्या काही दिवासांपासून उन्हाचा तडाका प्रचंड वाढल्याने रक्ताचा तू़टवडा जाणवत होता. आणि याच पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचा मदतीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते धावून आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सुसज्ज रक्तपेढीमध्ये (Blood donation) रक्तदान केले.

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली (Blood donation) रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, तंत्रज्ञ रोहिणी देवकर, राजेश शिरसाठ, चेतन पवार, जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, संदीप माळी आदींनी सहकार्य केले.

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

 

Ani anna Gote advt

यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय (Blood donation)  मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. विकास पाटील, डॉ. मोईज देशपांडे, महानगर समन्वयक दीपक घ्यार,शहर समन्वयक चेतन परदेशी, मुक्ताईनगरचे विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, विशाल परदेशी, दीपक पाटील, अनिल पवा, राहुल पाटील, शुभम सपकाळे, धीरज राठोड, गोपाल मोरे, रोशन ठाकरे, विशाल पारधी, विजय कोळी, राजेंद्र सपकाळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

हे सुद्धा वाचा :- 

Kolkata businessman hits blood donation century

राज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी