29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यठाण्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकॉस असोशिएशनतर्फे रक्तदान शिबिर

ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकॉस असोशिएशनतर्फे रक्तदान शिबिर

ठाणे : लयभारी

कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली आरोग्यसेवा आणि रक्ताचा तुटवडा या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि सामाजिक भान म्हणून ठाणे परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकॉस असोशिएशन मुंबई महाराष्ट्र या संस्थेमार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पश्चिम येथील आर जे ठाकुर स्कुल, सावरकर नगर येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे. १३ मार्च २०२२ ला आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी १० ते दुपारी २ वाजताच्या सुमारास हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

दरवर्षी आपल्या देशात सुमारे ५ कोटी युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यापैकी केवळ २.५ कोटी युनिट रक्त उपलब्ध असते. शहरातील रक्ताचा तुटवडा पाहता मानवी रक्ताला इतर कोणताही पर्याय नसतो म्हणून या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी