29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeनोकरीमुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची संधी

मुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची संधी

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी भरती केली जाणार आहे. ही भरती पाच पदांसाठी असल्याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल(BMC, job opportunities for graduates in municipality).

अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये पद्वीधर असावा. पालिकेच्या रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या अधिष्ठाता, अधिक्षक व उपअधिष्ठाताना ही अट लागू नाही. या उमेदवाराला रुग्णालयीन प्रशासकीय कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

उमेदवार दहावी,  बारावीमध्ये शंभर विषयांचा मराठी विषय उत्तीर्ण असावा. त्याला कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे आवश्यक ज्ञान असावे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कायदा आणि नियमांची माहिती असावी. लेखन व संवाद कौशल्य उत्तम असावे.

अर्जदाराचे वय १ जनेवारी २०२० पर्यंत ३८ वर्षे इतके असावे. या उमेदवारांना पालिकेच्या अंतर्गत  प्रमुख रुग्णालयांमध्ये नियुक्ती दिली जाईल. तिथे खातेप्रमुखांनी दिलेली सर्व कामे करावी लागतील.

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Mumbai: Two constables suspended, helps acquaintance in police recruitment drive

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी