30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार , महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार , महापौर किशोरी पेडणेकर

टीम लय भारी

मुंबई महापालिकेची आज मुदत संपणार आहे. आणि महापालिकेच्या कामकाजावर प्रशासक नियुक्ती करण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचा महापौर येणार आणि पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकणार”, असा विश्वास दाखवत त्या म्हणाल्या.(BMC  shiv sena’s saffron flag Kishori Pednekar)

पुढे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहेतच. कारण, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज काम करत आहेत, त्या अनुषंघाने पुन्हा एकदा शिवसेना येणार अशी हमी दिली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार उत्तमपणे काम करत आहेत हे बघता, मुंबईत लोकांच्या आशीर्वादावर आमचा भगवा राहणारचं आहे, असा विश्र्वास दाखवला आहे.

तसेच, उद्यापासून आमची नवी इनिंग सुरू होणार, आम्ही ज्या प्रकार लोकांसोबत काम करत आहोत तसं करत राहू. आमचा कार्यकाळ संपला जरी असला तरी आमची पत संपलेली नाही. लोकांसाठी जे काम करायचं आहे ते आम्ही करतच राहू. जोपर्यंत दुसरा महापौर निवडून येत नाही तोपर्यंत मी मुंबईची जबाबदारी मी स्वत: घेईन.

हे सुद्धा वाचा

महापौर किशोरी पेडणेकरांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

महापौरांची मोठी घोषणा; आता ‘यांना’ मास्कची सक्ती नाही

महापौरांची मोठी घोषणा; आता ‘यांना’ मास्कची सक्ती नाही

Once people join BJP, they get clean: Mumbai Mayor Kishori Pednekar on ED, CBI, IT Dept raids

खुर्चीवर तर मी बसणार नाही पण मुंबईची जबाबदारी ही मी महापौर नसली तरी घेईन. कुठेही संकट आलं तरी मी तिथे पोहचेन. मी माझ्या मुंबईकरांना अर्ध्या वाटेत नाही सोडू शकत.” असंही पेडणेकर यांनी मुंबईकरांना विश्वास देत म्हंटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी