32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळली

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळली

टीम लय भारी 

पुणे : पुण्यातून रेल्वे स्टेशनवर (Pune railway station)  बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. या घटनेमुळे पुणे रेल्वे स्टेनवर एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले आहेत. bomb-like object was found at Pune railway station

संपूर्ण पुणे रेल्वे स्टेशन (Pune railway station) रिकामी करण्यात आलं आहे. काही वेळेसाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसरात बीडीडीएस पथकाकडून तपास सुरू करण्यात आलं आहे.

 पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्टेशनवर दाखल होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त म्हणाले की, “आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही.” bomb-like object was found at Pune railway station

हे सुद्धा वाचा: 

रखडलेले बांधकाम ३ महिन्यात पूर्ण न केल्यास कारवाई होणार : धनंजय मुंडे

Pune: Gelatin sticks found at railway station; bomb squad rushed to spot

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी