30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeव्यापार-पैसाआधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ !

आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ !

केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च रोजीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र अनेक नागरिकांनी आधार-पॅन लिंक न केल्यामुळे आता चार दोन दिवसांच्या मुदतीत आधार-पँन लिंक करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने आधार पॅन लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 30 जून 2023 अखेर नागरिक आता आपले आधार-पॅन लिंक करु शकणार आहेत. सरकारकडून ही पाचवी मुदतवाढ देण्यात आली आहे.

इनकम टँक्स लॉ 1961 च्या अँक्ट 139 AA नुसार ज्यांच्याकडे आधार आणि पॅन कार्ड असेल त्यांनी ही दोन्ही कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने 31 मार्च पर्यंतची मुदत दिली होती. जर 31 मार्च पर्यंत आधारला पॅन कार्ड लिंक केले नाही तर बँकेसंबंधीत आर्थिक व्यवहार करणे अडचणीचे ठरणार होते. मात्र सरकारने आता आधार पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला असला तरी तातडीने आधार पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

असे करा आधार पॅन लिंक

आधार पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्या

आता येथे उजवीकडे क्विक लिंक बटवावर क्लिक करा

आता लिंक आधारवर क्लिक करा

आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आधार नंबर आणि पॅन नंबर भरा

आता उजव्या बाजूला व्हॅलिड हे बटन दावा

आता तुम्हाला ओटीपी येईल त्यावरुन लिंकचा ऑप्शन मिळेल

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे आधार आणि पँन कार्ड लिंक होईल

 

आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास ही कामे खोळंबणार 
बँक खात्यातून 50 हजारांहून अधिकची रक्कम विना पॅन कार्ड काढता येणार नाही

10 लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता खरेदी करता येणार नाही

डीमॅट अकाऊंट देखील काढू शकणार नाही
म्युच्युअल फंडामध्ये 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम गुंतवता येणार नाही
50 हजार रुपयांहून अधिक रकमेचा डीडी (डिमांड ड्राफ्ट) बनविता येणार नाही
जर आपल्याकडे पॅन नंबर नसेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात टॅक्स भरावा लागणार

दुचाकी वाहन सोडल्यास इतर वाहन खरेदी करण्यास अथवा विकण्यासाठी अडचणी येणार

तुम्हाला बँक डेबिड कार्ड आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देऊ शकते

कोणत्याही ठिकाणी 50 हजार रुपयांहून अधिकचा आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येणार

वर्षभरात 50 हजारांहून अधिकचा विमा हप्ता भरण्यासाठी देखील अडचणी येणार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी