28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरव्यापार-पैसाराष्ट्रवादाच्या नावाखाली अदानीचे गोलमाल, पण फ्रॉडच्या सत्यापासून पळता येणार नाही; हिंडनबर्गचा जोरदार...

राष्ट्रवादाच्या नावाखाली अदानीचे गोलमाल, पण फ्रॉडच्या सत्यापासून पळता येणार नाही; हिंडनबर्गचा जोरदार प्रहार

संशोधन अहवालावरील अदानी समूहाच्या 413 पानी उत्तरावर हिंडनबर्गचे प्रत्युत्तर, मूळ प्रश्न आणि आरोपांना उत्तर टाळून हा अहवाल म्हणजे भारताविरोधातील कटकारस्थान असल्याचे अदानी समूहाने दिले होते प्रत्युत्तर ►►► अदानी समूहाने तब्बल 413 पानी उत्तर देतांना हिंडनबर्गने उपस्थित केलेल्या 88 मुद्यांपैकी फक्त 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे. उर्वरित 62 प्रश्नांना अदानीने उत्तर दिलेले नाही. त्याऐवजी गोलमाल करून राष्ट्रवादाच्या तिरंग्यात हे प्रकरण लपेटण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे.

राष्ट्रवादाच्या नावाखाली अदानीचे गोलमाल सुरू आहे, पण त्यामुळे फ्रॉडच्या सत्यापासून पळता येणार नाही, अशा शब्दात हिंडनबर्गने जोरदार प्रहार केला आहे. (Adani Cannot Be Run Away) संशोधन अहवालावरील अदानी समूहाच्या 413 पानी उत्तरावर हिंडनबर्गने हे प्रत्युत्तर दिले आहे. रिसर्च अहवालावर हिंडनबर्ग ठाम आहे. तत्पूर्वी, मूळ प्रश्न आणि आरोपांना उत्तर टाळून हा अहवाल म्हणजे भारताविरोधातील कटकारस्थान असल्याचे अदानी समूहाने प्रत्युत्तर दिले होते. मात्र, राष्ट्रवादामुळे फसवणूक पुसली जाऊ शकत नाही, असे हिंडनबर्गनेही ठासून सांगितले.

यूएस-ट्रेडेड बाँड्स आणि नॉन-इंडियन-ट्रेडेड डेरिव्हेटिव्हमध्ये हिंडनबर्गने अदानी समूहाचे रेटिंग आणखी घसरवले आहे. अदानी समूहाने अहवालाला दिलेल्या 413 पानांच्या प्रतिसादावर हिंडनबर्गने प्रत्युत्तर दिले आहे. या रिसर्च संस्थेने म्हटले आहे, की त्यांच्या अहवालानंतर भारतीय समूहाने जबरदस्त विक्रीचा मारा सुरू केला आहे. भारतीय शेयर बाजारासह जगभर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेर्समध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. यातूनच रिसर्च रिपोर्टच्या सत्यता आणि तथ्यांची पुष्टी होते.

अदानी समूहाच्या कंपन्यात परदेशातील शेल (बनावट) कंपन्यांची गुंतवणूक
अदानी समूहाच्या कंपन्यात परदेशातील शेल (बनावट) कंपन्यांची गुंतवणूक

“आमच्या संशोधन अहवालात मुख्यत: ऑफशोअर संस्थांसह असंख्य संशयित व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले गेले. अदानी समूहाच्या प्रत्युत्तरात त्यावर कोणताही प्रकाश टाकण्यात आला नाही. या बेनामी आणि संशयास्पद व्यवहारांबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. प्रत्येक प्रमुख आरोपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शब्दबंबाळ आणि राष्ट्रवादाचा मुलामा दिलेल्या उत्तराने अदानी समूहाने केलेल्या फसवणुकीचे तथ्य पुसले जाऊ शकत नाही,” असे हिंडनबर्गने म्हटले आहे.

अदानी समूहाने तब्बल 413 पानी उत्तर देतांना हिंडनबर्गने उपस्थित केलेल्या 88 मुद्यांपैकी फक्त 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे. उर्वरित 62 प्रश्नांना अदानीने उत्तर दिलेले नाही. त्याऐवजी गोलमाल करून राष्ट्रवादाच्या तिरंग्यात हे प्रकरण लपेटण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर या आठवड्यात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये तब्बल 2.5 अब्ज अमेरिकी डॉलर्स विक्री केली गेली. त्यामुळे कंपनीच्या उरावरील भरमसाठ कर्जाचा डोंगर आणि परदेशी कर आश्रयस्थानांच्या (टॅक्स हेव्हन) गैरवापराविषयीही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हिंडनबर्गच्या अहवालात, अदानी समूहाने मॉरिशस आणि कॅरिबियन बेटांसारख्या टॅक्स हेव्हन्समध्ये ऑफशोअर संस्थांचा वापर केल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही ऑफशोर फंड आणि शेल (बनावट) कंपन्या या अदानीच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये गुप्तपणे गुंतवणूक करीत असल्याचंही संशय व्यक्त केला गेला होता.

हिंडनबर्गच्या अहवालात असेही म्हटले आहे, की अदानी समूहाच्या सात प्रमुख लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांनी चालू गुणोत्तर (करंट रेशो) हा 1 पेक्षा कमी दाखवला आहे. प्रत्यक्षात हा करंट रेशो म्हणजे तरल मालमत्ता (लिक्विड अॅसेटस्) वजा नजीकच्या मुदतीच्या दायित्वांचे (नीअर टर्म लायबलिटीज) यांचे मोजमाप असते. त्यातूनच वाढीव अल्पकालीन तरलता जोखीम म्हणजे शॉर्ट टर्म लिक्विडिटी रिस्क सूचित केली गेली आहे.

हे सुद्धा वाचा : 

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

Raju Shetty : तुमची भूक नेमकी भागणार तरी कधी ? राजू शेट्टी विचारणार अंबानींना प्रश्न

Adani Reply to Hindenburg
अदानी समूहाने हिंडनबर्ग संशोधन अहवालासंदर्भात दिलेल्या 413 पानी उत्तरातील पृष्ठ क्रमांक 24, ज्यात खाण्यासाठी सुरक्षित भाज्यांच्या उत्पादनातील अदानीच्या पुढाकाराचे वर्णन केले आहे. अदानी समूहाने तब्बल 413 पानी उत्तर देतांना हिंडनबर्गने उपस्थित केलेल्या 88 मुद्यांपैकी फक्त 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे. उर्वरित 62 प्रश्नांना अदानीने उत्तर दिलेले नाही. त्याऐवजी गोलमाल करून राष्ट्रवादाच्या तिरंग्यात हे प्रकरण लपेटण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंडनबर्ग संशोधन अहवालात कोणत्याही पुराव्याशिवाय “ऑफशोअर संस्थांबाबत दिशाभूल करणारे दावे” करण्यात आले आहेत, असे अदानी समूहाने म्हटले आहे. त्याच दिवशी हिंडनबर्गने अशा प्रकारच्या कारवाईचे स्वागत करू, असे प्रती आव्हान दिले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी