24 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरव्यापार-पैसाBank Strike : पुढच्या आठवड्यात बँकिंग सुविधा पडणार ठप्प! बँक कर्मचाऱ्यांचा संप

Bank Strike : पुढच्या आठवड्यात बँकिंग सुविधा पडणार ठप्प! बँक कर्मचाऱ्यांचा संप

पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने दोन दिवसीय संप पुकारला आहे.

पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने दोन दिवसीय संप पुकारला आहे. बँक ऑफ बडोदाने स्टॉक एक्सचेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे.

संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालये सुरू ठेवण्यासाठी सर्व योग्य पावले उचलली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँकेच्या शाखा आणि कार्यालयांच्या कामावर परिणाम होऊ शकतो, असे बँकेने म्हटले आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी येत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारी बँक बंद असते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारीही संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

Justice DY Chandrachud : सुप्रीम कोर्टाची कमान मराठी माणसाच्या हातात

एक, शनिवारी बँकांचा संप असेल आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सुट्टी आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना बँकेच्या एटीएममध्ये दोन दिवस रोकड टंचाईला सामोरे जावे लागू शकते. बँक कर्मचारी आपल्या अनेक मागण्यांसाठी संपावर जात आहेत. ज्यामध्ये बँक युनियनमधील सक्रिय बँकर्सवर मुख्य कारवाई केली जात आहे. बँकर्सना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे बँक युनियनचे म्हणणे आहे. बँक युनियन्सशी संबंधित बँकर्सची छाटणी किंवा बडतर्फ केले जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!