28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeव्यापार-पैसाCyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दुभाजकाला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दुभाजकाला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.  हा अपघात पालघरच्या चारोटी विभागात आज दुपारी सव्वातीन वाजल्या सुमारास झाला. सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला धडकली. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. तर अपघातात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले. पुढे 2013 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. मात्र 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. मुंबईमध्ये पारसी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते पुत्र होते. लंडनमधील इंपिरियल कॉलेज मधून इंजिनिअरिंग पदवी घेतली होती. लंडन बिझनेस स्कुलमधून त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते.

हे सुद्धा वाचा –

Congress NCP : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सत्तेत असताना खीर ओरपली, विरोधात जाताच म्याव मांजर झाले !

BJP: ‘हिंदू सण हा भाजपचा आत्मा’

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ते उदयोग क्षेत्रातील तरूण पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आघाडीच्या उदयोजकांपैकी एक होते. मिस्त्री कुटुंबाने देशात महत्त्वाचे रस्ते प्रकल्प, धरण आणि उदयोग उभे केले आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय उदयोग क्षेत्राला मोठी हानी झाली आहे.

महामार्गांवर सर्रास होणाऱ्या अपघातांवर भाष्य करताना पवारांनी महामार्गावर वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, महामार्गावर रस्त्यांची गुणवत्ता सुधारली असली तरी तेथील वेग मर्यादेवर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी कठोर नियम बनवून त्यांची काटेकोर पद्धतीने अमंलबजावणी करणे महत्त्वाचे झाले आहे.

आमचा यू ट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा –

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी