महाराष्ट्रातील उद्योग – व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रीकल्चर अंतर्गत विविध तज्ञ समित्यांचे गठण करण्यात आले(Dharmendra Pawar as Chairman of E-Commerce Committee) असून ‘डिजिटल इकाॅनाॅमी व ई काॅमर्स’ समितीच्या चेअरमनपदी अमृतवेल समुहाचे प्रमुख धर्मेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; सचिन पायलट यांच उपोषण!
महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील उद्योग, व्यापार, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था आहे. संस्थेची द्वैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. शतकमहोत्सवी वर्षाचा समावेश असलेल्या या ऐतिहासिक कार्यकारिणीमधील तज्ज्ञ समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही नुकत्याच जाहिर करण्यात आल्या आहेत. यामध्ये धर्मेंद्र पवार यांच्याकडे ‘डिजीटल इकाॅनाॅमी व ई – काॅमर्स’ समितीच्या चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पवार हे बँकिंग, फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट क्षेत्राविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहे. गेली तेरा वर्षे आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकासामध्ये सातत्यपूर्ण काम करीत आहेत. येणाऱ्या काळात डिजीटल इकाॅनाॅमी आणि त्याचबरोबर ई – काॅमर्स क्षेत्र व्यापक प्रमाणात विस्तारणार आहे. दोन्ही क्षेत्रांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष उद्योग आणि व्यापारावर प्रभाव होणार आहे. यापार्श्वभूमीवर पवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी देण्यात आली असून चेंबरचे उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी हे या समितीचे पालक असणार आहेत.
बाळासाहेब थोरातांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले