तुमचे पॅन आधारशी कसे लिंक कराल ते जाणून घ्या. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, तुमचे पॅन-आधार लिंक नसेल म्हणजे पॅन कार्ड हे आधार कार्डशी जोडलेले नसेल तर तुमची अत्यंत महत्त्वाची कामे अडण्याचा धोका आहे. यामुले आर्थिक फटकाही बसू शकेल. त्यामुळे आयकर विभागाने सुचविल्यानुसार, आपले पॅन कार्ड तातडीने आधारशी लिंक करण्यातच हित आहे.
आयकर विभागाच्या वेबसाईटवर सुचविलेल्या अधिकृत माहिती आणि पद्धतीला अनुसरूनच हे लिंक करा. इतर कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवरील लिंकचा त्यासाठी वापर करू नका. लक्षात ठेवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे भारत सरकारच्या आयकर विभागाची एकमेव अधिकृत वेबसाईट आहे – इन्कमटॅक्सईफायलिंग डॉट गव्ह डॉट इन (https://incometaxindiaefiling.gov.in/) याच वेबसाइटवर तुम्ही काम करत असल्याची अॅड्रेसबार मध्ये खात्री करून घ्या. युटीआय आणि एनएसडीएल या अन्य दोन अधिकृत सरकारी वेबसाईटवरही तुम्ही हे लिंकिंग करू शकता.

तुम्ही पुढील प्रक्रियेनुसार तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता :
1. आयकर विभागाची अधिकृत ई-फायलिंग पोर्टल उघडा – https://incometaxindiaefiling.gov.in/
2. त्यावर नोंदणी करणे (युझर रजिस्ट्रेशन) आवश्यक असते. आधी नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून घ्या. तुमचे पॅन कार्ड म्हणजे कायम खाते क्रमांक हेच तुमचे युझर नेम किंवा युझर नेम असेल.
3. युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून ई-फायलिंग पोर्टल वर लॉग इन करा.
4. एक पॉप-अप विंडो दिसेल, जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल. नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा. (तुमच्या मोबाइल किंवा पीसीवर पॉप अप ब्लॉकर इन्स्टॉल असल्यास ते डिसेबल करा)
5. पॅन तपशीलानुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील आपोआप फिल केलेले असतील म्हणजे आधीच नमूद केलेले असतील.
6. स्क्रीनवरील पॅन तपशील तुमच्या आधारवर नमूद केलेल्या तपशीलांसह जुळत असल्याची खात्री करा. जर काही तपशील जुळत नसतील, मिसमॅच असेल, तर तुम्हाला त्या कागदपत्रांमध्ये योग्य ती दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे.
7. तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक टाका आणि “लिंक करा” बटनावर क्लिक करा.
8. त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी यशस्वीरित्या लिंक झाले आहे, असा पॉप-अप मेसेज येईल.
9. तुमचे पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ या अन्य दोन अधिकृत वेबसाइटनाही भेट देऊ शकता.
हे सुद्धा वाचा :
आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क
बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या