31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरव्यापार-पैसानव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना यंदा आर्थिक मंदीचा फटका (Economic Recession) बसण्याचा धोका असल्याचे अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी (IMF chief warns) म्हटले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, २०२३ हे वर्ष चीन, अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गेल्या वर्षीपेक्षा अधिक खडतर असेल. या देशांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख यावर्षी खाली घसरेल असे त्यांनी म्हटले आहे. अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना हा गंभीर इशारा दिला आहे.

युक्रेनमध्ये गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष, वाढती महागाई, दिवसेंदिवस वाढत असलेले व्याजदर आणि चीनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा वाढता संसर्ग या पार्श्वभूमीवर क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी ही भीती व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जगातील एक तृतीयांश अर्थव्यवस्थेला यंदा मंदीचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षापेक्षा यंदा अमेरिका, युरोप आणि चीनला आर्थिक मंदीचा फटका बसण्याचा धोका आहे. ज्या देशात आर्थिक मंदी नसेल त्या देशातील नागरिकांना देखील आर्थिक मंदी असल्यासारखे वाटेल असे देखील क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यावेळी म्हणाल्या.

अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सन २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात विकास दरात घट केली होती. सन २०२१ मध्ये जागतिक विकासदर ६ टक्के होता तो २०२१ मध्ये ३.२ टक्क्यांवर आला तर सन २०२२ मध्ये विकासदर २.७ टक्यांवर आला. जगतिक आर्थिक संकट आणि कोरोना महामारीचा काळ वगळता सन २००१ नंतरची ही सर्वाधिक कुमकुवत अशी वाढ असल्याचे देखील जॉर्जिव्हा यावेळी बोलताना म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा 

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

क्लास वन अधिकारी कल्याणकारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; आजपासून सामूहिक रजेवर, सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांच्या कृषि महोत्सवावर बहिष्कार

चीन मध्ये लोकांच्या सरकारविरोधी लाटेनंतर चीनने आपले शु्न्य कोरोना धोरण रद्द केले असून अर्थव्यवस्था खुली केली आहे. आगामी काही काळ चीनसाठी खडतर असेल, चीनच्या आर्थिक विकास दरावर पुढील काही काळ नकारात्मक परिनाम दिसून येतील. तसेच जागतिक आर्थिक विकास दरावर देखील काही काळ नकारात्मक परिनाम दिसून येतील असे ज़ॉर्जिव्हा यावेळी बोलताना म्हणाल्या.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!