29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्यापार-पैसाJIO New Offer : जिओच्या नव्या ऑफरमुळे ग्राहक आनंदी, आता वापरायला मिळणार...

JIO New Offer : जिओच्या नव्या ऑफरमुळे ग्राहक आनंदी, आता वापरायला मिळणार 112GB डेटा

जिओच्या एका रिचार्जमध्ये आता यूझर्सला तब्बल 56 दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह एसएमएचा देखील लाभ मिळणार आहे.

आजकाल सर्वत्र महागाईचे प्रमाण वाढले आहे. अगदी रोजच्या वापरातील अत्यंत महत्तवाची गरज बनलेल्या मोबाईल फोनच्या रिचार्जची किंमतदेखील आस्मानाला भिडल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशातंच आता जिओने आपल्या यूझर्सला आनंदाजी बातमी देत एअरटेलसारख्या कंपन्यांना धक्का दिला आहे. जिओच्या एका रिचार्जमध्ये आता यूझर्सला तब्बल 56 दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह एसएमएचा देखील लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हाला दोन महिन्यांपर्यंत कोणत्याही अतिरिक्त रिचार्जची गरज भासणार नाही. जिओच्या या प्लॅनमुळे सामान्य नागरिक आनंदी झाला असला तरी इतर कंपन्यांची मात्र झोप उडाली आहे.

जिओचा 533 रुपयांचा प्लॅन
या प्लानची किंमत 533 रुपये आहे. यामध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएससह अनेक फायदेही दिले जात आहेत. या प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला दोन महिने कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये यूजर्सला दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. दररोज 2 GB डेटा हाय-स्पीड वापरता येतो. त्याच वेळी, हा डेटा संपल्यानंतर, 64Kbps स्पीड राहील. एकूण, संपूर्ण वैधता दरम्यान तुम्हाला 112 GB डेटा मिळेल.

याशिवाय तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर दररोज 100 एसएमएसही दिले जात आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला जिओ ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जात आहे. यामध्ये तुम्हाला JioCinema, JioSecurity, JioCloud वर मोफत प्रवेश मिळेल.

एअरटेलचा प्लॅन:
एअरटेल कंपनी 549 रुपयांमध्ये 56 दिवसांच्या वैधतेचा प्लान देत आहे, ज्यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. यासोबतच दररोज अनलिमिटेड कॉलिंगसह 100 एसएमएसही दिले जात आहेत. याशिवाय एक्सट्रीम मोबाईल पॅक आणि अपोलो 24|7 सर्कलसह अनेक फायदे दिले जात आहेत. मात्र, जिओप्रमाणे अतिरिक्त डेटाची सुविधा उपलब्ध नाही शिवाय जिओपेक्षा 16 रुपये अधिक आकारल्याने एअरटेलला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मोबाईल व सिमकार्ड कंपन्यांमध्ये वाढत असलेल्या चुरसीमुळे यासर्व ऑफर्स अनेकवेळा बाजारात येत आसतात. याचा थेट फायदा ग्राहकांना होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी