34 C
Mumbai
Tuesday, May 23, 2023
घरव्यापार-पैसापॅन आधार लिंक पाच दिवसात करा, नाहीतर ...

पॅन आधार लिंक पाच दिवसात करा, नाहीतर …

तुम्ही अजूनही तुमचा पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबरशी लिंक केला नसेल, तर हे काम पाच दिवसात पूर्ण करा. यासाठी 31 मार्च 2023 ही शेवटची मुदत आहे. या पाच दिवसांत तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. तुम्ही तुमचे पॅन कार्ड कुठेही वापरू शकणार नाही.

तुम्ही अजूनही तुमचा पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबरशी लिंक केला नसेल, तर हे काम पाच दिवसात पूर्ण करा. यासाठी 31 मार्च 2023 ही शेवटची मुदत आहे. या पाच दिवसांत तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. तुम्ही तुमचे पॅन कार्ड कुठेही वापरू शकणार नाही.

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. व्यक्ती आणि संस्थांसाठी, विशेषत: आयकर उद्देशांसाठी ओळखकर्ता म्हणून पॅन कार्ड काम करते. आता तर राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून त्याला दर्जा परांप झाला आहे. तुमच्या ओळखीचा व पत्त्यांचा पुरावा म्हणून तुम्ही ते वापरू शकता. जर तुमच्याकडे अजूनही पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. म्हणूनच तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय, पॅन-आधार लिंक नसल्यास तुमची 10 महत्त्वाची कामे थांबतील.

तुम्ही एक एप्रिलपासून पुढील कामे करू शकणार नाहीत –
  1. वाहने खरेदी करू शकणार नाहीत.
  2. मोटार विमा देखील उपलब्ध होणार नाही.
  3. मुदत ठेव खाते आणि मूलभूत बचत बँक खात्याशिवाय कोणतेही बँक खाते उघडता येणार नाही. एफडी आणि बचत खात्यात 50,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम फक्त ठेवता येईल. याशिवाय, बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एका दिवसात रु. 50,000 पेक्षा जास्त रोख ठेव जमा करता येणार नाही.
  4. क्रेडिट-डेबिट कार्ड आणि डिमॅट खात्यासाठी अर्ज करता येणार नाही.
  5. म्युच्युअल फंडात 50,000 पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकणार नाही.
  6. RBI बॉण्ड्स, कंपनी बॉण्ड्स किंवा डिबेंचर्स खरेदी करण्यासाठी एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणे कठीण होईल.
  7. एका आर्थिक वर्षात एकूण 50,000 रुपयांपेक्षा जास्त जीवन विमा प्रीमियम (एलआयसी हफ्ता) भरणे त्रासदायक ठरेल.
  8. 10 लाखांपेक्षा जास्त किमतीची कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी आणि विक्री करू शकणार नाही.
  9. प्रति व्यवहार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त वस्तू किंवा सेवांची खरेदी आणि विक्री करण्यात अडचण येईल.
  10. परदेशात प्रवास करताना एका वेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंट करू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा : 

पॅन आधारशी कसे लिंक कराल ते जाणून घ्या

Budget 2023 : पॅन कार्ड हे आता राष्ट्रीय ओळखपत्र; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा

आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क

Link PAN Aadhaar, PAN Aadhaar link, How do I link PAN with Aadhaar, link your PAN with Aadhaar, How to link PAN with Aadhaar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी