30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeव्यापार-पैसाOrganic Fertilizers : 'या' राज्यातील महिला बनवतात जैवीक खत

Organic Fertilizers : ‘या’ राज्यातील महिला बनवतात जैवीक खत

रासायन‍िक खतांमुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे गोमुत्रापासून तयार केले जाणारे खत शेतकरी मोठया प्रमाणात वापर आहेत. कारण रासायन‍िक खत तसेच कीटकनाशक (Organic Fertilizers) हे किंमतीला देखील महाग असते.

झारखंडच्या लोहरदगा जिल्हयातील महिला गो-मुत्रापासून कीटकनाशक आणि खत तयार करत आहेत. हा व्यवसाय आता वाढू लागला आहे. त्यांच्या जैवीक शेतीची कल्पना शेतकरी तसेच सरकारी अधिकाऱ्यांना पटली आहे. 30 रुपये प्रति लीटर भावाने हे कीटकनाशक विकले जाते. रासायन‍िक खतांमुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे गोमुत्रापासून तयार केले जाणारे खत शेतकरी मोठया प्रमाणात वापर आहेत. कारण रासायन‍िक खत तसेच कीटकनाशक (Organic Fertilizers) हे किंमतीला देखील महाग असते.

लोहरदगा मधील महिला या उदयोगातून 5 ते 6 हजार रुपये कमवत आहेत. औषधीयुक्त मटका खत बनवणे तसे सोपे काम आहे आणि खर्च देखील कमी आहे. ते बनव‍िण्यात 10 लीटर गोमूत्र, एक किलो शेण, 200 ग्रॅम गुळ,  नीम, करंज आणि सिंदुवारची पानांचा उपयोग केला जातो. या मिश्रणाचा एकाच वेळी कीटकनाशक तसेच खत म्हणून उपयोग केला जातो. या कामामुळे महिलांच्या हातात पैसा येत आहेत.

घरातील सर्व कामे करतांना ते हा व्यवसाय करत आहेत. गावांमध्ये बहूतेक जणांकडे गुरे असतात. त्यामुळे त्यांना हे काम करणे सोपे झाले आहे. हे मटका खत मातीमध्ये मिसळले की, झाडे तरारून येतात. कैरो परिसरातील चार गावातील महिलांनी गट तयार केले आहेत. या महिला एकत्र येऊ हे औषधीयुक्त मटका खत बनवतात. उतका, डुमरटोली, नगडा आणि खंडा गावात अशा प्रकारचे खत  बनवले जाते.

हे सुद्धा वाचा

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Navratri 2022 : नवरात्रीच्या गरब्यासाठी शाळेच्या गेटला कुलूप

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

या औषधामुळे शेतात कीड लागत नाही. पिके देखील चांगले येते. पीकांची गुणवत्ता सुधारली असून, शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. लोहरदगाच्या कृषि अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. ते म्हणतात की, जैविक शेतीसाठी या महिला शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहेत.
या खत आणि कीटकनाशकामुळे भात, मका, तुर या सारख्या पीकांना चांगला उपयोग झाला आहे.

जैव‍िक शेती करण्यावर कृषी विभाग देखील भर देत आहे. भविष्यात अशा प्रकारची शेती करणे जरूरीचे आहे. या खतामुळे मातीचे चांगल्या प्रकारे पोषण होते. तसेच प्रदूषण देखील कमी होते. तसेच अनेक प्रकारचे आजार देखील कमी होतात. अशा प्रकारे प‍िकवण्यात आलेले अन्न हे आयोग्यासाठी उत्तम आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी