25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeव्यापार-पैसाPetrol-Diesel : आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Petrol-Diesel : आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात वारंवार पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढत असल्याच्या बातम्या येत असतात. शिवाय सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. मात्र, आता देशभरात महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

पेट्रोलियम कंपन्यांचे मार्जिन वाढले
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे दर कमी करण्यामागचे कारण आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे मार्जिनही वाढले आहे. आता त्यांनी तोट्याऐवजी नफा मिळवायला सुरुवात केली आहे. हे पाहता पेट्रो कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कपात करू शकतात.

हे सुद्धा वाचा

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात कोर्टाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच! संजय राऊतांची कोठडी वाढली

Morbi Bridge Collapse : ‘देवाची करणी’ ! मोरबे पूल प्रकरणात ओरवे कंपनीच्या व्यवस्थापकाचा अजब दावा

एका वर्षात पहिल्यांदाच किंमती घसरल्या
एका अहवालानुसार, जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या तर मे 2022 नंतर तेलाच्या किमतीतील ही पहिली घट असेल. मे महिन्यात सरकारने दोन्ही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते. सरकारी तेल कंपन्यांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठे मार्जिन मिळू लागले आहे. कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांपर्यंत मार्जिन मिळत आहे.

विंडफॉल कर कमी केला
केंद्र सरकारच्या विंडफॉल टॅक्समुळे कंपन्यांच्या नफ्यातील वाटा कमी झाला आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतींवरील दबाव कमी होण्यात झाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे दोन रुपयांची कपात केल्यास जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते, तेव्हा ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 115 होती, जी सध्या प्रति बॅरल $ 95 वर चालू आहे. सप्टेंबरमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल $ 90 वर गेली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी