28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeव्यापार-पैसामहाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संजय सोनवणे बिनविरोध

महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संजय सोनवणे बिनविरोध

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या सन २०२४-२०२६ च्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी संजय सोनवणे तर नाशिक शाखा चेअरमनपदी अंजु सिंघल यांची निवड निश्चित केली. तसेच कार्यकारिणी सदस्य पदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्ष ललित गांधी यांनी विशेष पुढाकार घेऊन दोन्ही पॅनेल च्या सर्व उमेदवारांच्या बैठका घेऊन नाशिककर उमेदवारांनी एक दिलाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून या विभागातील व्यापारी, उद्योजकांच्या व्यवसाय विकासाच्या प्रयत्नात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या सन २०२४-२०२६ च्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी संजय सोनवणे (Sanjay Sonawane) तर नाशिक शाखा चेअरमनपदी अंजु सिंघल यांची निवड निश्चित केली. तसेच कार्यकारिणी सदस्य पदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्ष ललित गांधी यांनी विशेष पुढाकार घेऊन दोन्ही पॅनेल च्या सर्व उमेदवारांच्या बैठका घेऊन नाशिककर उमेदवारांनी एक दिलाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून या विभागातील व्यापारी, उद्योजकांच्या व्यवसाय विकासाच्या प्रयत्नात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.(Sanjay Sonawane unopposed as North Maharashtra vice-president of Maharashtra Chamber of Commerce)

सर्व उमेदवारांनी अध्यक्ष ललित गांधी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्ही सर्वांनी ललित गांधी यांच्या नेतृत्वात एकत्रित पणे काम करायचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी चेंबर चे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,सदस्य संदीप भंडारी, राजाराम सांगळे, नाइस चे अध्यक्ष रमेश वैश्य, कांतीलाल चोपडा, विजय बेदमुथा, यांनी विशेष भूमिका पार पाडली

निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांचे नाशिक मधील विविध संघटना संस्था प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले.

दोन्ही पॅनलच्या सदस्यांनी एकमताने निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.

दोन्ही गटाच्या सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध झाली.

कार्यकारणी सदस्य पदी भरत येवला, रणजीतसिंह आनंद, सुनील कोतवाल, रवी जैन, बाळासाहेब गुंजाळ, रतन पडवळ, सचिन जाधव, स्वप्निल जैन, दिपाली चांडक, सचिन शहा, सुरेश चावला, सत्यजित महाजन, वेदांशू पाटील, संदीप सोमवंशी, सोनल दगडे यांची बिनविरोध निवड झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी