31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeव्यापार-पैसाकमी CIBIL स्कोअरवरही हमखास कर्ज मिळू शकते; जाणून घ्या एका क्लिकवर

कमी CIBIL स्कोअरवरही हमखास कर्ज मिळू शकते; जाणून घ्या एका क्लिकवर

आपण जर एखाद्या सुप्रसिद्ध कॉर्पोरेट कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेत काम करत असल्यास बँक किंवा कर्ज संस्थेला तुमच्या उत्पन्नाची इतरांपेक्षा अधिक खात्री मिळते. तुमच्या उत्पन्नावर तुम्ही कर्जाची वेळेत परतफेड करू शकता अशी बँकेची खात्री झाल्यास अशा अर्जदारांना EMI भरण्याची क्षमता, नोकरीची स्थिरता यावर तुमच्या कर्जाला मंजूरी मिळू शकते. पण जर तुमचा सिबील खराब असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. ज्यांचा सिबील चांगला त्यांनाच कर्ज मिळते. त्याचप्रमाणे कमी CIBIL मुळे तुमच्या कर्जाचा अर्ज मंजूर केला जाणार नाही ही धारणा आता सोडून द्या. कारण आता कमी सिबील असतानाही तुम्हाला कर्ज मिळू शकते. ज्या लोकांचा CIBIL स्कोअर कमी आहे किंवा त्यांनी नवीन क्रेडिट घेतले आहे त्यांच्यासाठी काही मार्ग आहेत. ज्यामुळे तुम्हाला हमखास कर्ज मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात..

डिजिटल एनबीएफसीचा पर्याय
NFBC (NBFC) म्हणजेच Non Banking Financial Company. या कंपन्या अगदी बँकेप्रमाणेच कर्ज देतात. पण, त्यांना कायदेशीर बँक म्हणून मान्यता नाही. या खाजगी वित्तीय कंपन्या असून कर्जाचा व्यवहार करतात. अनेक एनबीएफसी आणि नवीन युग डिजिटल कर्ज संस्था कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांना वैयक्तिक कर्ज देतात. पण, अशा NBFC द्वारे देऊ केलेत्या कर्जाचा व्याजदर बँकांपेक्षा जास्त असतो.Tight regulations, rising cost of funds can pose challenges to NBFCs, say experts

सह अर्जदारासह अर्ज करा
तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास तुम्ही कुटुंबातील कमावत्या सदस्याला सह-अर्जदार बनवून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. यामुळे तुम्हाला कर्ज देणारी बँकेची जोखीम कमी होते. कारण, या प्रकरणात सह अर्जदारही तुमच्याप्रमाणे कर्जाची परतफेड करण्यासाठी तितकेच जबाबदार असतात. पण, यात तुमच्या सहकारी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असला तरी सह अर्जदार सोबत असल्याने कर्ज मिळण्यात अडचण येणार नाही.Home Load Guide: Critical Things To Do After Your Loan Is Repaid

वैयक्तिक कर्जाची रक्कम कमी निवडा
CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी आपण कमी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करावा. ज्यामुळे तुम्हाला कर्ज परतफेड करणे सोपे होईल तसेच बँकेलाही कर्ज देताना जोखीम कमी वाटेल. कमी क्रेडिट स्कोअर असलेले अर्जदार कर्ज मिळवण्यासाठी जमीन, मुदत ठेव, सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात.Factors That Affect Your Personal Loan Interest Rate - Bajaj Markets

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय कराल ?
तुमचे सीबील खराब आहे अशावेळी होमलोन घ्यायचे आहे. 1 वर्षानंतर घर मिळणार असेल तर सीबील सुधारण्यासाठी गृहकर्ज घेण्यासाठी एक उपाय आहे. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तिथे 50 हजारांची एक फिक्स डिपॉझिट करा. त्या फिक्स डिपॉझिटसाठी एक क्रेडिट कार्ड apply करा. बँक तुम्हाला 40 हजारांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड देईल.

हे क्रेडिट कार्ड दर महिन्याला 20 ते 50 टक्के वापरा. त्याचे बिल जनरेट झाले की 3 दिवसांच्या आत पेमेंट करा. वेळेत पेमेंट केल्याचे 3 आणि कार्ड वापरायचे 3 असे 6 पॉईंट्स तुमच्या सिबिल स्कॉरला जमा होतील. त्यामुळे पुढील 6 ते 12 महिन्यात सिबिल स्कोर सुधारेल. शिवाय फिक्स डिपॉझिटचे बँक तुम्हाला 6 टक्के व्याज देईल ते वेगळचे.

हे सुद्धा वाचा: 

टपाल खात्याद्वारे व्यवसायाची संधी: 5 हजारांत लाखो कमवा; जाणून घ्या सविस्तर योजना

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ग्रामसुरक्षा योजना

Secured loan with low CIBIL score; know more

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी