29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeएज्युकेशनCBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर

टीम लय भारी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) १२ वीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून या निकालाची वाट पाहण्यात येत होती. दरवर्षी पेक्षा यंदाचा CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी दिसून आली.

यंदाच्या वर्षी CBSE बोर्डातून सुमारे १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. http://cbse.gov.in किंवा http://results.cbse.nic.in या संकेत स्थळांवरून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. या संकेत स्थळांवर जाऊन विद्यार्थी आपला बैठक क्रमांक (Seat No.) टाकून आपला निकाल मिळवू शकतात. तसेच विद्यार्थी आपल्या निकालाची प्रिंट देखील काढू शकतात.

CBSE बोर्डात यंदाच्या वर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे. CBSE बोर्डात मुलींनी ९४.५४ % मिळवत सर्वाधिक मुली उर्त्तीण झाल्या आहेत. तर मुलांना ९१.२५ % मिळविता आले आहेत.

हे सुद्धा वाचा :

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती’ पदावर विराजमान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी