29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीय....तर सर्व आंबेडकरी जनता निवडणुकीत नोटा चा वापर करतील किंवा बहिष्कार घालतील....

….तर सर्व आंबेडकरी जनता निवडणुकीत नोटा चा वापर करतील किंवा बहिष्कार घालतील….

टीम लय भारी

माननीय उद्धवजी ठाकरे साहेब , मुख्यमंत्री ,

महाराष्ट्र राज्य ,

मुंबई .

महोदय ,

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांना येण्यास आपल्या सरकारने विरोध केला आहे(Chaityabhoomi: The government opposed the arrival of Ambedkar’s followers)

तुमच्या संघी विचारधारेच्या प्रशासनातील  कारकूनांनी तसा जी. आर .च काढला आहे . कदाचित तुम्हाला त्याची माहिती असेल नसेल तर खात्री करून घ्या साहेब .

“पावसकर विरुध्द मुंबई कसोटी सामना”

“पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही”; काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले

तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून तुमची सर्वसाधारण सामान्य जनतेशी नाळ तुटत चालली आहे असे आम्हाला वाटते . तुम्ही  वरिष्ठ कारकुंड्याच्या नादी लागला आहात असे दिसते . तुम्हाला ते अशा पद्धतीने निर्णय पटवून देतील की तुम्हाला ” हो ” म्हणायला हतबल करतील .

साहेब पूर्वीचे सचिवालय आताचे मंत्रालय आहे . सचिवांवर मंत्र्यांचा अधिकार असावा म्हणून मंत्रालय झाले . मंत्रालय पुन्हा सचिवालय करू द्यायचे नसेल तर आताच सावध व्हा .सचिवांना त्याच्या जागी ठेवा . अत्यंत स्वार्थी असतात ही मंत्रालयातील अतिवरिष्ठ कारकून मंडळी . ते तुम्हाला राजकारणात कधी झिरो करून टाकतील हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही .

उद्योगपती गौतम अदानींनी घेतली नबान्ना येथे ममता बॅनर्जींची भेट

COVID-19 | Mahaparinirvan Diwas: Will devotees be allowed at Chaityabhumi this year? Here’s what Mayor Kishori Pednekar said

६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनाचा जी.आर . ताबडतोब रद्द करायला सांगा साहेब . दिवाळी , दसरा आणि इतर सण लोकांनी आनंदाने साजरे केले . फक्त आम्हा आंबेडकरवाद्यांना ही मंडळी ” मनुस्मृती नियम ” कसा लावू शकता साहेब ?

साहेब आम्ही चैत्यभूमीवर आनंद साजरा करायला , ढोल ताशे घेऊन मजा मारायला येत नसतो .आमच्या समाजाला ज्या महापुरुषांने हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर काढले त्या आमच्या मुक्तीदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनेपोटी आम्ही चैत्यभूमीला वंदन करायला येत असतो .

लाखोंची संख्या पण सर्व काही  शांततेत . कोणतीही गडबड गोंधळ नाही  . इतके असून सुद्धा कोणते लॉजिक लावून आपण बंदी आणीत आहात हेच आम्हाला समजत नाही.

 ग्रामपंचायतीच्या निवडणुका , सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका , तुमच्या नेतेमंडळींचे भरभरून कार्यक्रम , कार्तिकी एकादशी , येणारे साहित्य संमेलन सगळे काही मौजमजेत करूनच या तथाकथित कोरोना कायद्याचे आपल्या सरकारने पालन केले आहे ना ?  सामाजिक अंतर , मास्क ,  व्हॅक्सिनेशन अशा ठिकाणी किती पालन होते हे आपण पहिलेच आहे .

साहेब तुमचा चुलत भाऊ कधीच मास्क घालत नाही . त्यांनी दोन डोस घेऊन सुद्धा त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे फक्त आपल्या माहितीसाठी .

साहेब , मागील दोन वर्षे आम्ही सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन केले . आम्ही आमच्या मंडळींना समजावून सांगितले की घरीच वंदन करा . आपली आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने कोरोना आपल्याला परवडणारा नाही . आम्ही एकमेकांना सांगितले . आम्ही एकमेकांचे ऐकले .

साहेब ,चैत्यभूमीवर आम्ही कोंबड्या-बकऱ्या कापायला जात नाही . नवस फेडायला किंवा बोलायला अनुयायी येत नाहीत . आम्ही चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करून सोबत पुस्तके घेऊन जातो . एखाद्या साहित्य संमेलनात  चार दिवसात विकली जात नाहीत इतकी पुस्तक विक्री एका दिवसात होते . एका दिवसात प्रचंड पुस्तक विक्री होणारे जगातील एकमेव  ठिकाण म्हणजे चैत्यभूमी .

आमची मंडळी विमानातून येणार नाहीत साहेब . ती तर पायी , लोकल , बस , ट्रेनमधून येणार आहेत . साहेब , मागील कोरोनाच्या अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे की , कोरोना हा श्रीमंतांमुळे पसरला . गरिबांमुळे नाही . तरीसुद्धा त्याचा फटका घरकाम करणाऱ्या स्त्रियांना बसला . त्यांना बिल्डिंगमध्ये काम करण्यासाठी येण्यास मज्जाव करण्यात आला . त्या स्त्रियांनी गरिबीमुळे ते सर्व सहन केले साहेब . कोरोना हा विमानांमधून आला आणि तुम्ही लोकल बंद केली . हा उफराटा न्याय नाही का हो साहेब ?

तुमचे आरोग्यमंत्री म्हणतात की ओमीक्रोन इतका डेंजर नाही . मग कशाला लांडगा आला रे म्हणून आम्हाला घाबरवत आहात .आजच्या तारखेला आपल्या संपूर्ण देशात एकही ओमीक्रोनचा रुग्ण नाही . तरीसुद्धा तुमचे सरकार सर्वसामान्य नागरिकांना घाबरवून टेंडरचे  सेंटर बनवून करोडो नफा कमवीत आहेत . तुमच्या करोडोवर आमचा काहीही आक्षेप नाही .तुम्ही कमवित रहा .आमच्या शुभेच्छा .परंतु आम्हाला सहा डिसेंबरला चैत्यभूमी वर आमच्या बापाच्या दर्शनाला तर येऊ द्या . तुमच्याकडून इतकीच माफक अपेक्षा आहे .

तुमचं सरकार म्हणतय की घरीच वंदन करा . साहेब बरोबर आहे . घरीच वंदन केले असते परंतु तुमच्या लाडक्या संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न सुद्धा दहा-बारा लोकांच्या साक्षीने कोर्टात होऊ शकले असते ना? तुमच्या गुलाबराव पाटल

मुलाच्या लग्नात हजारो लोक आले होते .जर त्यांनी पाटलाच्या वाड्यावरच मंगलाष्टका टाकली असती तर किती किती छान झाले असते साहेब . साहेब , मेन प्रॉब्लेम इथे आहे .

साहेब समजून घे आमच्या भावना . त्या भाजपला विरोध करण्याच्या नादात तुम्हाला आम्ही किती सपोर्ट करायचा ? आम्ही आंबेडकरवादी तुमच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करतो . व्हाट्सअप ,फेसबुक अशा समाजमाध्यमांवर आम्ही तुमच्या बाजूने बिनधास्तपणे उभे राहतो . तुम्हाला साथ देतो . भाजपावर तुटून पडतो . तेव्हा तुम्ही समजून घेणार आहात की नाही ?

त्या संघी वरिष्ठ कारकुन यांच्या नादी लागून तुम्ही आंबेडकरवाद्यांना नाहक नाराज करीत आहात .

साहेब प्रबोधनकारांचे फक्त पुस्तक प्रकाशित करून चालत नाही तर त्यांच्यासारखे धाडसी निर्णय घ्यावे लागतात . बाबासाहेबांचे आणि प्रबोधनकारांचे नाते तुम्हाला ठाऊक असेलच ? बाबासाहेबांच्या कित्येक चळवळीत प्रबोधनकारांनी तेव्हाच्या त्यांच्या स्वजातीय विरोधकांना डावलून मनापासून साथ दिली होती . तुम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या अनुयायांना या प्रशासकीय कारकुंड्याना डावलून मनापासून चैत्यभूमीवर येण्याची एक सरकार म्हणून परवानगी द्यावी ही नम्र विनंती .

साहेब तीन चार दिवस राहिलेत . मुंबई आणि महाराष्ट्रात भरपूर अवकाळी पाऊस चालू आहे . या निसर्गाच्या लहरीमुळे अनुयायी कमीच येण्याची शक्यता आहे . तुम्ही जर जी . आर . रद्द केलात तर तुम्ही हिरो व्हाल .

जी .आर .लवकरात लवकर रद्द करा . अन्यथा तमाम आंबेडकरी जनता येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घालतील किंवा नोटाचा उपयोग करतील . आणि हो ही धमकी नाही . संविधानाने दिलेल्या अधिकारा अंतर्गतच हा निर्णय आम्ही घेण्याच्या विचारात आहोत .

जय भीम ! जय महाराष्ट्र !! जय भारत !!!

एक आंबेडकरवादी ,

अ‍ॅड. विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी ,
मुंबई .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी