महाराष्ट्रराजकीय

सुप्रिया सुळे यांनी माझ्या वक्तव्याचा ‘पराचा कावळा’ केला : चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटलांनी अत्यंत अपमानास्पद भाषेत टीका केलीये.

टीम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशा (Chandrakant patil) अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटलांनी अत्यंत अपमानास्पद भाषेत टीका केलीये. “तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant patil comments on Supriya Sule)

सुप्रिया सुळे यांनी माझ्या वक्तव्याचा 'पराचा कावळा' केला : चंद्रकांत पाटील

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. याच वातावरणात पाटलांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय र्वतुळात चर्चेला उधान आले आहे. चंद्रकांत पाटीलांनी (Chandrakant patil) सुप्रिया सुळेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांची आहे.

आज माध्यामांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी माझ्या या वक्तव्याचा ‘पराचा कवळा’ केला. पवार आणि सुळे परिवाराशी माझे चांगले संबंध आहे. मी सुप्रियाताई सह सर्व महिला वर्गाचा मान ठेवतो, परंतू सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा समज करून घेतला आहे. सदानंद सुळे यांनी थोड ग्रामीण भागात राहवं. तिथे अशाच पध्दतीत म्हणी वापरल्या जातात… अशा प्रकार चंद्रकांत पाटलांनी स्वत:ची पाठराखण केली.

चंद्रकांत पाटीलांना केलेली टिका

“कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant patil) सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केलीये.

हे सुद्धा वाचा :- 

Go home and cook: Maharashtra BJP chief in soup after sexist comments on Supriya Sule

दिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

अनिल परबांच्या घरी ईडीची छापेमारी,आता भाजप नेत्यांना टिकेसाठी खुले मैदान

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close