33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र'चंद्रकांतदादा हिमालयात कधी जातायं?' भन्नाट मीम आणि बॅनरची सोशल मिडियावर चर्चा

‘चंद्रकांतदादा हिमालयात कधी जातायं?’ भन्नाट मीम आणि बॅनरची सोशल मिडियावर चर्चा

टीम लय भारी 

मुंबई:  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या. या विजयानंतर सोशल मिडियावर आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे. ‘चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय? या आशयाचा  बॅनर पुण्यात लावण्यात आला आहे. 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) निवडणुकीच्या प्रचारात असे म्हणाले होते की कोल्हापुरातूनही निवडणूक लढवू शकतो. ती निवडणूक हरलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन. याविधाना वरुन त्यांना डिवचलं जातं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या याच वक्तव्यावरून एक मीम शेअर केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसले आहेत.

त्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

हे सुध्दा वाचा:

पुणेकर म्हणतात की, चंद्रकातदादा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

No Poll Alliance with Those Who Betrayed Us, Says Maharashtra BJP Chief

महाराष्ट्रात भोंगा आणि हनुमान चालिसावरुन राजकीय चकमक सुरू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी