30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरात जनतेचा कौल काँग्रेसला मात्र काही हजारोंनी वाढलेल्या मतांमध्ये चंद्रकांत पाटलांनी मानले...

कोल्हापूरात जनतेचा कौल काँग्रेसला मात्र काही हजारोंनी वाढलेल्या मतांमध्ये चंद्रकांत पाटलांनी मानले समाधान

टीम लय भारी 

कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्याकडे १८ हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे. तर सत्यजित कदम हे मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले (Chandrakant Patil) आहेत.(Chandrakant Patil on Kolhapur Election Results)

चंद्रकांत पाटीलांची निवडणुकीतील पराभवा नंतरची पहिली प्रतिक्रिया 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

मा. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  म्हणाले की, काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या (Chandrakant Patil)  विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे
ते म्हणाले की, भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही.

हे सुद्धा वाचा :- 

Jayashri Jadhav of Congress wins battle of prestige in Maharashtra’s Kolhapur

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणा-या धर्मांध शक्तींना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले : बाळासाहेब थोरात 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी